17/11/2022
*होय !!! जुनी पेन्शन शक्य आहे!*
*मित्रहो!*
*2005 पासून शासनाने नवी पेन्शन योजना सुरू केली आणि 2005 नंतर लागलेल्या प्राध्यापकांची सुरक्षितता धोक्यात आली. १३ वर्षे नोकरी केल्यानंतर 1000 च्या आत पेन्शन मिळत आहे. 2005 नंतर सेवेत आलेल्या अनेक कर्मचाऱ्यांचे अकाली मृत्यू झाले, परंतु त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून कुठली मदत झाली नाही. 4 जानेवारी 2020 मध्ये एक शासन निर्णय आला त्यात शासनाने 12 नोव्हेंबर 2010 च्या शासन निर्णयानुसार परतावा द्यावा असे म्हटले आहे परंतु तो परतावा किती ? हे सांगितलं नाही. काही निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची व्यथा एवढी भयंकर आहे की त्यांना 1300,1600 एवढे निवृत्तीवेतन मिळत आहे त्यांचा उदरनिर्वाह कसा होईल ? हा गंभीर प्रश्न आहे. काही वर्तमानपत्रांमधील कात्रणे मी यासंदर्भात या सोबत जोडलेले आहेत ही समस्या फार गंभीर आहे. आणि म्हणून आपण अधिक गंभीर होऊन ही समस्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करूया!*
*आपण इंडियन नेटसेट असोसिएशनच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच जुन्या पेन्शनचा आग्रह धरूनच काम करत आहोत. त्यासाठी इन्साच्या सर्व आंदोलनाचा एक भाग नव्या पेन्शनला विरोध करणे हा राहिला असून जुन्या पेन्शनचा आग्रह आपण धरला आहे. जंतर मंतर नवी दिल्ली येथे थर्ड अमेंडमेंट रद्द करण्यासाठी उपोषणाला जेव्हा बसलो त्या दहा मागण्यांपैकी पहिली मागणी ही जुनी पेन्शन रद्द करावी ही होती. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मी त्यांच्या दालनात प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्यासोबत जुनी पेन्शन योजना लागू करावी या संदर्भात चर्चा केली मागण्याचे निवेदन दिले, तेव्हा त्यांना मी सांगितले की आम्ही प्राध्यापक आहोत ! आमच्या ताब्यात दररोज 500 मतदार असलेले विद्यार्थी असतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण वर्ग आमच्या ताब्यात असतो आम्ही ओपिनियन लीडर आहोत. त्यामुळे आपण जर जुनी पेन्शन योजना सुरू केली तर तो लोकप्रिय निर्णय असेल आणि सरकारला मदत करणारा असेल. चंद्रकांतदादा पाटलांनी मला शब्द दिला की या संदर्भात लवकरच मी तुम्हाला, तुमच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावणार आहे .आणि यातून सकारात्मक काय निर्णय घेता येईल या संदर्भात आपण विचार करू बंधूंनो जुनी पेन्शन योजना लागू करावी यासंदर्भात सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत प्राध्यापकांचा निर्णय हा सर्वात शेवटी होत असतो म्हणून प्राध्यापकांना या आंदोलनामध्ये तन-मन-धनाने सहभागी होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून मी तुमच्यासोबत कायमच्या लढाईत असणार आहे. सिनेटमध्ये मी आपल्याला आस्वस्त करू इच्छितो की पहिल्याच सिनेट सभेमध्ये जुनी पेन्शन लागू करावी असा ठराव मांडून तो पास करून घेण्यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करेल आणि आणि इतर सदस्य सुद्धा त्याला विरोध करणार नाहीत. आपल्या विद्यापीठाने हा ठराव सरकारकडे पाठविल्यास आणि प्रत्येकच विद्यापीठाने असे ठराव करून सरकारकडे पाठवले तर अकॅडेमीक लेव्हलवर याचा निश्चित सरकारवर दबाव वाढेल आणि रस्त्यावरच्या लढाईत आपण त्याला निर्णयापर्यंत आणू, हा विश्वास मला आहे लहान लहान आंदोलनातून मोठे मोठे प्रश्न मार्गी लागताना मी बघितले आहे नेटसेटला एमफीलचा पर्याय आला तेव्हा तो रद्द करण्यासाठी लहान लहान आंदोलनातून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि तो पर्याय तो रद्द झालेला आहे. मला विश्वास आहे की आपण जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करू शकतो. यासाठी आपल्याला प्रत्येकाला प्रयत्न करण्याची गरज आहे मी एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून आपणास विनंती आहे येत्या 20 तारखेला मला प्रथम पंसतीचे मत देऊन आपल्यासाठी लढणारा कार्यकर्ता म्हणून मला अधिसभेत लढण्याचे बळ द्यावे ही विनंती*
*आपला*
*Payas K.P.*
*डॉ.कमलाकर पायस*