Shri Gajanan Maharaj Mandir and Sansthan Alandi

Shri Gajanan Maharaj Mandir and Sansthan Alandi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Gajanan Maharaj Mandir and Sansthan Alandi, Religious organisation, Shri Gajanan Maharaj Mandir, Opp MIT college, Dehu/Alandi Road, Pune, Alandi.

07/01/2020
25/11/2019
25/11/2019

श्री गजानन महाराज संस्थान शेगांव - शाखा आळंदी

#श्रीगजाननमहाराजसंस्थानशाखाआळंदी
#श्रींचापालखीसोहळा
#श्रीज्ञानेश्वरमहाराजसंजीवनसमाधीसोहळा #आळंदीवारी
#श्रीगजाननमहाराजपालखीसोहळा


https://www.facebook.com/shrinchapalkhisohalaupdates/

02/10/2019

■ हे कुठलंही 5 स्टार हॉटेल किंवा रिसॉर्ट नाही. हे एका शेगाव नावाच्या एवढ्याश्या गावातील "भक्त निवास" आहे. संत गजानन महाराज मंदिर संस्थांनाअंतर्गत निर्मित आणि चालित अनेक उपक्रमांपैकी स्वच्छता आणि सुविधेचा सर्वोच्च गाठलेला हा एक उपक्रम. शेगावला सर्वदूर ठिकाणांहून भाविक भेट देत असतात. त्यांच्या राहण्यासाठी केलेली ही सोय. रूमचा किराया रुपये 0/- पासून 900/- पर्यंत. पण 900 रुपयांची आणि 0 रुपयांची खोली सारखीच स्वच्छ आणि टापटीप. धुळीचा कण नाही की कागदाचं कस्पट नाही! भाविकांच्या लहान सहान गरजा लक्ष्यात घेऊन डोकं गुंग होऊन जावं इतकं बरकाईने लक्ष्य दिलेलं. पार्किंगमध्ये ठेवलेल्या व्हीलचेअरपासून प्रसाद म्हणून द्रोणात काही दिल्यास आठवणीनं मिठाची पुडी देण्यापर्यंत. शिवाय दर पन्नास पावलांवर भारतीय/पाश्चात्य प्रसाधन. आपल्या घरच्यापेक्षा कैकपटीने स्वच्छ! गजानन महाराज मंदिर संस्थानचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इतके शंभरातले फक्त चार दोन लोकच पगारी आहेत. बाकी सर्वजण सेवादान करतात. तुम्ही कुठे बसल्या बसल्या नकळत हातातला कागद खाली टाकलात तर एक सेवेकरी येतो आणि हासमुखाने सफाई करून जातो. इथली स्वच्छता एक भारतीय म्हणून आपल्या मुस्कडात मारून जाते! संस्थानांतर्गत कुठेही तुम्हाला अस्वच्छता दिसणार नाही. अगदी 600 एक्कर पसरलेल्या "आनंद सागर" उद्यानात देखील कोपरा न् कोपरा चकाचक दिसतो. क्षणभर आपण भारतात आहोत की नाही कळणार नाही. कुठे जळमटं नाहीत, सुपारी खाऊन थुंकलेले डाग नाहीत, प्रसाधनांच्या बाहेर दुर्गंध नाही, धूळ नाही, रंगाचे पोपडे उडालेले नाहीत काहीच नाही. शिवाय इथे खाण्यापिण्याचे दर पाहून संसदेच्या "त्या" वायरल पोस्टची हमखास आठवण येते. 7 रुपयांना इथे प्लेटभर पोहे आणि 14 रुपयांना पायनापाल शेक मिळतो!! हे सगळं असलं तरी दरवर्षी किमान 20-25 लाख लोकांना पाहुणचार देणारे "शेगाव" मात्र अत्यंत बकाल आहे. संस्थान अंतर्गत येणारा परिसर सोडला तर बाकी गाव गलिच्छ आहे. उघड्या गटारी, त्यात लोळणारी डुकरं, कच्चे आणि अरुंद रस्ते, अतिक्रमण वगैरे भरपूर आहे. इथल्या स्थानिक नेत्यांना आणि पुढाऱ्यांना शरम नावाची चीज नाही, गेंड्याच्या कातडीचे कर्तृत्वहीन लोक इथे नेते बनले आहेत हे प्रकर्षाने जाणवत राहते! पण तो एक भाग सोडला तर इथे गजानन महाराज मंदिर संस्थान मात्र आपली आणि इतर एखाद दोन जणांची बोटं तोंडात घालण्याइतपत कुशल आहे! नास्तिक असलात तरी केवळ मेडीटेशनम्हणून इथल्या लोकांचं कौतुक करण्यासाठी भेट देणे निश्चित अकवश्यक आहे
।।जय गजानन।।

Sant Shree Gajanan Maharaj Mandir Alandi
26/09/2019

Sant Shree Gajanan Maharaj Mandir Alandi

28/07/2019

|| श्री गजानन महाराज आरती ||

जय जय सतचित स्वरूपा स्वामी गणराया।
अवतरलासी भूवर जड मुढ ताराया॥
जयदेव जयदेव

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी।
स्थिरचर व्यापून उरलें जे या जगताशी॥

तें तूं तत्त्व खरोखर निःसंशय अससी।
लीलामात्रें धरिलें मानव देहासी॥
जयदेव जयदेव

होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा।
करूनी गणि गण गणांत बोते या भजना॥

धाता हरिहर (नरहरी) गुरुवर तूंचि सुखसदना।
जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना॥
जयदेव जयदेव

लीला अनंत केल्या बंकट सदनास।
पेटविलें त्या अग्नीवाचूनी चिलमेस॥

क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश॥
जयदेव जयदेव

व्याधी वारून केलें कैकां संपन्न।
करविले भक्तालागी विठ्ठल दर्शन॥

भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण।
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन॥
जयदेव जयदेव

जय जय सतचित-स्वरूपा स्वामी गणराया।
अवतरलासी भूवर जड मुढ ताराया॥
जयदेव जयदेव

07/04/2019

Address

Shri Gajanan Maharaj Mandir, Opp MIT College, Dehu/Alandi Road, Pune
Alandi
412105

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Gajanan Maharaj Mandir and Sansthan Alandi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share