विठ्ठल भक्तिरस

विठ्ठल भक्तिरस आलो निजाच्या माहेरा ।। भेटी रखुमाईच्या वरा ।। ram krsna hari

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩* ्री_विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*          *शनिवार दि- २२ ऑगस्ट २०२६*            *🌹काकडा आरती🌹*      ...
22/08/2026

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
* ्री_विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*शनिवार दि- २२ ऑगस्ट २०२६*

*🌹काकडा आरती🌹*
*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

*🙏🏻🌹...संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥1॥**तुह्मी कृपा केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥**गोविलों थोरिवां । ...
04/08/2026

*🙏🏻🌹...संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥1॥*

*तुह्मी कृपा केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥*

*गोविलों थोरिवां । दुःख वाटतसे जीवा ॥2॥*

*तुका ह्मणे माया । अवरा हे पंढरिराया ॥3॥*

*🙏🏻🌹.. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🏻*

*🙏🏻🌹.. शुभ सकाळ..🌹🙏🏻*

*अर्थ*

तुकाराम महाराज म्हणतात की, जगातील इतर संत आणि लोक मला मोठा मान देतात, माझा आदर करतात, पण हे पाहून मला स्वतःचीच लाज वाटते.

त्यांचे मन त्यांनाच साक्ष देत आहे (चित्त ग्वाही देत आहे) की, 'हे देवा, अजूनही माझ्यावर तुझी खरी कृपा झालेली नाही.' बाहेरचे लोक मला मानत असले, तरी अंतर्यामी मी अजूनही अपूर्ण आहे, याची जाणीव त्यांना होते.

मी उगाचच जगातील लौकिक मोठेपणात (थोरिवीत) गुंतलो गेलो. त्यामुळे आता माझ्या आत्म्याला/जीवाला दुःख होत आहे आणि पश्चाताप होत आहे.

शेवटी तुकाराम महाराज पंढरीरायाला (विठ्ठलाला) कळकळीची विनंती करतात की, "हे पांडुरंगा, आता ही संसाराची व लौकिकाची माया आवरून घे आणि मला यातून मुक्त कर."

02/08/2026
॥॥ आषाढ शुद्ध पौर्णिमा //  श्री गुरु पौर्णिमा // श्री व्यास पौर्णिमा ॥॥नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।पराप्रमे...
29/07/2026

॥॥ आषाढ शुद्ध पौर्णिमा // श्री गुरु पौर्णिमा // श्री व्यास पौर्णिमा ॥॥

नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ ॥

*|| 🌄👏 व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् 🌎🚩 ||*

*॥॥ आषाढी एकादशी ॥॥*॥॥  ॐ षड्गुण ऐश्वर्य संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता श्री विठ्ठला ।।🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩* ्री_विठ्ठल व रुक्मिणी...
25/07/2026

*॥॥ आषाढी एकादशी ॥॥*

॥॥ ॐ षड्गुण ऐश्वर्य संपन्न भाग्यवंता अहो रमाकांता श्री विठ्ठला ।।

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
* ्री_विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर*
*शनिवार दि- २५ जुलै २०२६*

*🌸नित्य पुजा🌸*
*🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻*

*🌹आषाढी यात्रा🌹*
*🚩देवशयनी एकादशी🚩*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

॥॥ भागवत एकादशी ॥॥आम्हां विष्णुदासां हें चि भांडवल। अवघा विठ्ठल धन वित्त॥१॥वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें। करोनियां चि...
11/07/2026

॥॥ भागवत एकादशी ॥॥

आम्हां विष्णुदासां हें चि भांडवल।
अवघा विठ्ठल धन वित्त॥१॥

वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें।
करोनियां चित्तें समाधान॥धृ॥

तुका म्हणे द्रव्य मेळविलें मागें।
हें तों कोणासंगें आलें नाहीं॥२॥


आम्हा हरिदासांना विठ्ठल हेच भांडवल आहे आणि आमचे धन, वित्त सर्वकाही विठ्ठलच आहे. आमच्या या भांडवलामध्ये कोणत्याही प्रकारचा तोटा नाही.

त्यामुळे चित्तामध्ये समाधान आहे आणि आम्ही चित्त समाधान करून लागेल तेवढे ते नाम सेवन करतो.

तुकाराम महाराज यामागे अनेक लोकांनी द्रव्य मिळवले आहे. पण ते द्रव्य कोण संगे गेलेही नाही व कोणा बरोबर आलेले देखील नाही. पण आमच्या जवळचे विठ्ठल नाम रुपी भांडवल आहे, धन आहे, द्रव्य आहे, ते नेहमी आमच्या बरोबरच राहते.

आवडें हें रूप गोजिरें सगुण । पाहतां लोचन सुखावले १ आतां दृष्टीपुढें ऐसाच्चि तूं राहें । जों मी तुज पाहें पांडुरंगा २ लां...
11/07/2026

आवडें हें रूप गोजिरें सगुण ।
पाहतां लोचन सुखावले १

आतां दृष्टीपुढें ऐसाच्चि तूं राहें ।
जों मी तुज पाहें पांडुरंगा २

लांचावलें मन लागलीसे गोडी ।
ते जीवें न सोडी ऐसें जालें ३

तुका म्हणे आम्ही मागावें लडिवाळी ।
पुरवावी आळी मायबापें ॥ ४ ॥

Address

Alandi
411019

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विठ्ठल भक्तिरस posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share