23/10/2024
🌹 #वाढदिवस_वारकरी_सेवकाचा🚩
श्री ह.भ.प. शरद महाराज पाटील खंडारे,
वारकरी क्रांती सेना,महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष
गुरुवर्य श्री संत वासुदेवजी महाराजांचे निष्ठावंत भक्त, संत सेवक, शरद महाराज पाटील यांचा आज अभिष्टचिंतन सोहळा त्यानिमित्य त्यांना उदंड आयुष्याच्या मनपुर्वक हार्दिक सुभेच्छा.
गुरुवर्य श्री संत वासुदेवजी महाराजांचे आशिर्वादाने आणि श्री संत भास्कर महाराज आदर्श सर्वांगीण बाल विकास सुसंस्कार चँरीट्रेबल ट्रस्ट र.नं.ई.५२९ अकोली जहाँगीर ता अकोट जि अकोला या संस्थेच्या वतीने दर्यापुर येथील उपशाखा संस्थेचे उन्हाळी बाल सुसंस्कार शिबिर राबवने गुरूवर्य वासुदेवजी महाराजांनी लाऊन दिलेली सुसंस्काराची शिकवण प्रत्येक विद्यार्थी पर्यंत पोहचवून सुसंस्कारी वारकरी संप्रदायिक विचारसरणी चे भक्त मंडळी तैयार करने यासंस्थेच्या उद्देशाला दाते मंडळी लोकांची भक्त मंडळीची मदत घेऊन सर्व कार्ये शरद महाराज पाटील निष्ठापूर्वक पार पाडत आहेत. वारकरी संप्रदायिक प्रचारक वारकरी संप्रदायिक विचारसरणी ने वारकर्यांच्या हक्कासाठी व वारकरी मंडळींना सुख सोयी साठी वारकर्यांचे प्रश्न राजकीय पातळीवर मांडायला व वारकरी तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार व पंढरपूर-देहू-आळंदीचे वारकरी. आपल्या परिसरात श्री संत भास्कर महाराज आदर्श सर्वागीण बाल सुसंस्कार शिबीर चालवित आहेत.
सामाजिक कार्यासोबतच वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा या साठी म्हणुन नेहमीच प्रयत्नशील असतात, श्री संत वासुदेवजी महाराजांचे कार्य ते तन-मन-धनाने नेहमी प्रत्येक कार्यात सहभागी होऊन करतात आध्यात्मिक कार्यामधे सहकार्य प्रत्येक गुरूगुरूभक्तांची मदत करतात . त्यांच्यावर गुरू माऊलींची नेहमी कृपा दृष्टि राहो हिच पांडुरंग परमात्माच्या चरणी प्रार्थना त्यांना 💯 शतकोत्तर निरोगी आरोग्य लाभो श्री संत वासुदेवजी महाराज त्यांचाकडून असेच सफलतापूर्वक वारकरी संप्रदायिक कार्य करून घेवोत. भागवताचार्य:- श्री.ह.भ.प.शरद महाराज पाटील* यांना नव अभिष्टचिंतन वाढदिवसाच्या मनपुुर्वक हार्दीक शुभेच्छा. त्याच बरोबर तुमच्या कडून संत सेवा घडत राहो! तुम्हाला आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
#सुभेच्छुक:- श्री.ह.भ.प.अशोक महाराज जायले
संस्थापक अध्यक्ष:- तथा विश्वस्त मंडळ श्री संत भास्कर महाराज चॅरिटेबल ट्रस्ट अकोली, (जहांगीर) ता. अकोट,