Shree swami samarth

Shree swami samarth || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

इ.स.1457 च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज ह्यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या. व त्यानंतर शैल यात्रेचे साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले. ह्या कर्दळी वनात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली.ह्या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ निर्माण केले.एके दिवशी उध्दव नावाचा लाकूडतोडया त्याच कर्दळी वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातून कुर्‍हाड निसटली.व ती वारूळावर पडली

. ही स्वामी महाराजांची लीलाच की त्या उध्दवाचे निमित्य साधून त्यांना पुन्हा भक्तांच्या कल्याणासाठी प्रगट व्हायचे होते. कुर्‍हाड वारूळावर पडताच त्यातून रक्ताची धार उडाली व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उध्दवासमोर एक आजानूबाहू तेजस्वी मूर्ती प्रगट झाली तेच अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज...

आपल्या हातून ह्या महापुरू्षाला जखम झाली ह्या विचाराने उध्दवाला दुःख झाले व भय वाटू लागले. पण भक्तांसाठी माताच असलेल्या महाराजांनी उध्दवाला अभय व आशीर्वाद देऊन गंगातीरावर प्रयाण केले.गंगातीरावर भ्रमण करता करता ते कोलकत्यास गेले व तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले. नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्यांनी शेगावचे श्री गजानन महाराज व शिर्डीचे श्री साई महाराज ह्यांना दीक्षा दिली. त्यानंतर स्वामी पंढरपूर , मोहळ असे भ्रमण करीत सोलापुरास आले. त्यानंतर मंगळवेढे नामक गावास स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले.भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळया वेगळया पध्दतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले.

इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोट प्रवेश केला.व तेथल्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात सर्व विश्वाला दैदिप्यमान असे तीर्थक्षेत्र अक्कलकोट करून जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले. आणि इसवी सन 1878 मध्ये स्वामींनी अनेकांना ्कार्यरत करून त्यांचा एक आविश्कार संपविला असे भासवले.परंतू प्रत्यक्षात स्वामी महाराज आज देखील भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करून कार्यरत करीत आहेत व अनंतकाळ पर्यंत करीत राहतील.

श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहे. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे. कोणाला श्री विठूमाऊलीच्या रूपात त्यांचे दर्शन घडले तर कुणाला श्री भगवान विष्णूच्या स्वरूपात तर कुणाला भगवती देवीच्या रूपात महाराजांनी भक्तांच्या कल्याणासाठी अनेक लीला दाखविल्या.


अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

ll श्री स्वामी समर्थ llश्री स्वामी समर्थ! 🙏स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा."भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे स्वा...
20/03/2026

ll श्री स्वामी समर्थ ll
श्री स्वामी समर्थ! 🙏
स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या शुभेच्छा.

"भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" हे स्वामींचे अभयवचन आजही कोट्यवधी भक्तांना बळ देते. ज्यांनी चराचरात भरून राहिलेल्या त्या निर्गुण निराकार तत्त्वाला 'स्वामी' रूपाने अनुभवले, त्यांच्यासाठी आजचा दिवस खरोखरच कृतज्ञता व्यक्त करण्याचा सोहळा आहे.

या मंगल दिनी तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच स्वामी चरणी प्रार्थना.

स्वामींनी अनेक वर्षे अक्कलकोटमध्ये राहून भक्तांचा उद्धार केला.
"अनन्यभावे मला शरण ये, तुझे सर्व भार मी वाहीन" हाच त्यांच्या शिकवणीचा सारांश आहे.
स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम!

ll श्री स्वामी समर्थ ll> नवे संकल्प, नवी उमेद आणि स्वामींचा वरदहस्त...> चैत्र पालवीच्या रंगात, सुखाची गुढी उभारूया,> श्र...
19/03/2026

ll श्री स्वामी समर्थ ll
> नवे संकल्प, नवी उमेद आणि स्वामींचा वरदहस्त...
> चैत्र पालवीच्या रंगात, सुखाची गुढी उभारूया,
> श्री स्वामी समर्थांच्या नामघोषात, नवीन वर्षाचे स्वागत करूया!
> तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
17/03/2026

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll
27/02/2026

ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थहर हर महादेव• ॐ नमः शिवाय •नागेन्द्रहराय त्रिलोचनाय ;भस्मागंरागाय महेश्वराय ॥नित्याय...
15/02/2026

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
हर हर महादेव

• ॐ नमः शिवाय •

नागेन्द्रहराय त्रिलोचनाय ;
भस्मागंरागाय महेश्वराय ॥
नित्याय शुद्धाय दिगम्बराय,
तस्मै "न" कराय नमः शिवाय॥

कर-चरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा
श्रवणनयनजं वा मानसं वापराधम,
विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व,
जय-जय करुणाब्धे, श्री महादेव शम्भो॥'

कैलास राणा शिव चंद्रमौळी |
फणींद्र माथा मुकुटी झळाळी ||
कारुण्य सिंधू भवदु:खहारी |
तुजवीण शंभो मज कोण तारी ||
ll श्री स्वामी समर्थ ll
!! ॐ नम: शिवाय !!
!! हर हर महादेव !!
!! महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !!

, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
10/02/2026

, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

Address

Akalkot

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree swami samarth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category