07/09/2025
1922 साली चालू झालेला गणेशोत्सव-
103 वर्षांची श्रद्धा आणि परंपरा लाभलेला भिंगार (अ.नगर) येथील मानाचा देशमुख वाडा गणपती आजही आपला सांस्कृतिक ठेवा जपत आहे. हा गणेशोत्सव आठच दिवसांचा असतो, आठव्या दिवशी (द्वादशीला) अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्याहस्ते उत्थापन पूजा झाल्यावर हा गणपती परंपरेनुसार सनई चौघडा आणि ढोल ताशांच्या गजरात पालखीतून मोठ्या दिमाखात संपूर्ण गावात मिरवत विसर्जित होतो. गावात जागोजागी सडा रांगोळी करून महिला वर्ग या गणरायाचे स्वागत करतात, आरती करतात, पुरुष मंडळी हार घालतात पालखीला खांदा देऊन काही वेळासाठी पालखीचे भोई होतात. याचे अजून एक वेगळेपण म्हणजे मंदिरातील फुलांची सजावट, पालखीची सजावट, सनई चौघडा वादन हे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता वेगवेगळ्या मुस्लिम बांधवांमार्फत केले जाते.