युगंधर युवा प्रतिष्ठान

युगंधर युवा प्रतिष्ठान " ab bhi jiska khoon na khaula,
khun nahi woh paani hai,
jo is desh ke kaam na aaye,
woh bekar jawan

सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना या साथ रोगाच्या काळामध्ये राज्यसरकार मुलांच्या शाळा व महाविद्यालय सुरू करण्याचा जो निर...
09/06/2020

सध्या जगभर थैमान घातलेल्या कोरोना या साथ रोगाच्या काळामध्ये राज्यसरकार मुलांच्या शाळा व महाविद्यालय सुरू करण्याचा जो निर्णय घेत आहे त्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविण्यासाठी आज युगंधर युवा प्रतिष्ठान तर्फे जिल्हा परिषद अहमदनगर येथे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांना निवेदन देण्यात आले...
शाळा चालू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला तर युगंधर युवा प्रतिष्ठान व्यापक आंदोलन उभे करेल असा इशारा हे निवेदन देतांना देण्यात आलेला आहे...
सदर निवेदन देतेवेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष एडवोकेट प्रदीप ढाकणे एडवोकेट राहूल रासकर एडवोकेट मंदार पळसकर व सिद्धांत शिंदे उपस्थित होते.

निवडणुकीत आपले मत न विकणाऱ्या....सर्व सन्माननीय नगरकर नागरिकांना...  #युगंधर  #युवा  #प्रतिष्ठान तर्फे नवीन वर्षाच्या खू...
01/01/2019

निवडणुकीत आपले मत न विकणाऱ्या....सर्व सन्माननीय नगरकर नागरिकांना... #युगंधर #युवा #प्रतिष्ठान तर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभकामना....

29/12/2018

लवकरच....

20/12/2018

#सामान्य #माणसाची #ताकद...... #खूप #खूप #खूप #मोठी #पोस्ट #आहे..... #पण #वेळ #काढून #ही #पोस्ट #वाचा #म्हणजे #वाचाच.....
बेजबाबदार 53 आरटीओ अधिकाऱ्यांना घरी बसविणारे कर्वे आजोबा!

योगेश कुटे
बुधवार, 19 डिसेंबर 2018

पुण्यातील आरटीओ अधिकाऱयाने वाहनाच्या पासिंगसाठी सकाळी ११ ते सहा असे बसवून ठेवले. तरीही काम केले नाही. त्यासाठी त्या अधिकाऱ्याने ११०० रूपये मागितले. या अधिकाऱ्याला भीक न दिल्याने श्रीकांत कर्वे या सामान्य माणसाचा त्या अधिकाऱयाने अपमान केला. या ७० वर्षीय कर्वे आजोबांनी या अपमानाचा बदला संपूर्ण आरटीओ विभागाला दणका देऊन घेतला.

पुणे : एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्याने दुचाकीस्वार ठार, पीएमटी बसचा ब्रेक फेल झाल्याने पादचारी ठार, बस दरीत कोसळून दहा ठार, अशा शीर्षकाच्या बातम्या वाचायच्या आणि पुढे जायचे. अशा अपघातांत आपल्या जवळचे कोणी नातेवाईक असतील तर ही बातमी वाचून दुःखाचा कढ आणखी वाढवणार. आपल्या किंवा अपघातग्रस्ताच्या नशिबाला दोष देऊन गप्प बसायचे, हेच सर्वसामान्यांच्या नशिबी!

या अपघाताला जबाबदार कोण याच्या मुळाशी जाण्याइतका वेळ आणि माहिती आपल्याकडे नसते. मात्र या अपघातांचे मूळ कारण शोधणारे श्रीकांत कर्वे या सिस्टिमशी गेली सहा वर्षे लढत आहेत. उच्च न्यायालयात चकरा मारत आहेत. परिवहन विभाग म्हणजेच आरटीओच्या हितसंबंधांशी टकरा घेत आहेत. वयाच्या 70 व्या वर्षीही हे काम ते तितक्‍याच काळजीने करत आहेत.

त्यांच्या पाठपुराव्यामुळे उच्च न्यायालयाने काही आदेश दिले. मात्र बथ्थड झालेली यंत्रणा हलली नाही. थातुरमातुर उपाय करून न्यायालयाचीच फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. हे देखील कर्वे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर कठोर झालेल्या न्यायमूर्ती अभय ओक यांनी तंबी दिल्यानंतर एकूण 53 आरटीओ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. हा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येने अधिकारी निलंबित झाल्याने हे खाते हादरले आहे. पण सुधारले आहे का, हे मात्र सांगू शकत नाही.

कर्वे यांच्या या लढ्याची सुरवात एका अपमानामुळे झाली. त्यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. त्यांचे वाहन वार्षिक तपासणीसाठी पुणे आरटीओ कार्यालयात आणले होते. सकाळी अकरा वाजता ते हजर झाले होते. त्या वेळी हे पासिंगचे काम करणारा अधिकारी टेबलावर पाय ठेवून रूबाबत बसला होता. संध्याकाळचे सहा वाजले तरी कर्वे यांचे वाहन त्याने तपासणीसाठी घेतले नाही. एजंटाकडून येणारी कामे मात्र तो तत्परतेने करत होता. संध्याकाळी सहा वाजता कर्वे यांनी याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने 1100 रूपयांची मागणी केली. त्यावर चिडलेल्या कर्वे यांनी, भीक सकाळीच मागायची होती. मला सात तास बसवून आता भीक मागतोस? मी देणार नाही, असा पवित्रा घेतला. त्यावर चिडलेल्या त्या अधिकाऱ्याने कर्वे यांनाच दमबाजी केली आणि माझे कोणी वाकडे करणार नाही, अशी शेखीही मिरवली. तसेच अपमानास्पद शब्द वापरून त्यांची जवळपास हकालपट्टीच केली. संतापाने तापलेल्या कर्वे यांनी या अधिकाऱ्याला धडा शिकविण्याचा इरादा त्याच्यासमोरच व्यक्त केला आणि या लढ्याला सुरवात झाली.


कर्वे यांच्या अपमानापोटी सुरू झालेली ही लढाई अजून सुरूच आहे. आरटीओ अधिकारी हे बस किंवा इतर परमीटची वाहने न तपासताच पास करतात. त्यांच्या अशा बेजबाबदार कृत्यामुळे रस्त्यावर अपघात घडतात. एक अधिकारी दिवसात जास्तीत जास्त 35 ते 40 वाहने तपासणे शक्‍य असताना रोज 400 हून वाहने तपासली जात असल्याची आकडेवारी कर्वे यांनी गोळा केली. अनेकदा वाहन तपासणीसाठी न येताही त्यांचे पासिंग होत असल्याचे कर्वे यांनी दाखवून दिले. अशी धोकादायक वाहने इतर प्रवाशांच्या जिवाला कसे जबाबदार आहेत, हे त्यांनी न्यायालयासमोर मांडले. विशेष म्हणजे उच्च न्यायालयात त्यांनी ही बाजू स्वतः मांडली. न्यायालयाने दोन ज्येष्ठ वकिलांना "अमॅक्‍युस क्‍युरी' (न्यायालयाचे मित्र म्हणून नेमले.) कर्वे यांनी दाखल केलेल्या याचिकेत तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर न्यायालयाने परिवहन विभागाला वाहने पासिंग करण्यासाठी काही आदेश दिले.

त्यानुसार पासिंग करताना त्यांचे व्हिडीओ चित्रण करण्याचा प्रमुख आदेश होता. परिवहन सचिवांनी या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले. त्यानुसार न्यायालयाने कर्वे यांची मूळ याचिका आदेश देऊन निकाली काढली. येथून पुढेच सारे रामायण घडले.

प्रत्यक्षात काही ठिकाणी कॅमेरे लावलेच नव्हते. लावलेले कॅमेरे योग्य क्वॉलिटिचे नव्हते. काही बहाद्दरांनी स्वतःच्या मोबाईलवर चित्रण केल्याचे सांगितले. परिवहन निरीक्षकांनी ज्या वाहनांची तपासणी केली त्याच्या किमान दहा टक्के वाहने ही संबंधित निरीक्षकाच्या वरिष्ठांनी तपासल्याचे खोटे अहवाल दिले. त्यामुळे न्यायालयाने आदेश देऊनही काहीच होत नसल्याचे कर्वे यांनी पुन्हा निदर्शनास आणून दिले. न्यायमूर्ती अभय ओक यांनी त्यावर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना तपासणी करायला सांगून कारवाईचे आदेश दिले. मात्र कोणीच कारवाई करत नसल्याने न्यायमूर्ती ओकांनी कडक शब्दांत झापले आणि परिवहन सचिवांवर अटक वॉरंट बजावण्याचा इशारा दिला. त्यानंतर यंत्रणा हलली. गेल्या काही दिवसांत आतापर्यंत अशा कामचुकार 53 अधिकाऱ्यांना निलंबित झाले.

अर्थात ही कारवाई पुरेशी नाही, असे कर्वे यांचे म्हणणे आहे. कारण तीन महिन्यांनंतर या निलंबितांना काम न करता पूर्ण वेतन द्यावे लागणार आहे. तसे निलंबित करताना सर्वांना सारखा न्याय लावलेला नाही. कोणाला निलंबित करायचे यावरूनही मलिदा खाण्यासाठी नवीन कुरण या विभागात सुरू झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. कनिष्ठ अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनविले जात असून वरिष्ठांना मात्र हात लावला जात नसल्याचेही त्यांनी दाखवून दिले. अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या वेतनावढी, बढत्या रोखण्याची कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कर्वे यांच्या याचिकेनंतर आता वाहने तपासणीसाठी ट्रॅक सुरू झाले आहेत. मात्र तेवढीच सुधारणा पुरेश नसल्याचे त्यांचे मत आहे. तसेच त्यांनी आता पीएमटीमुळे होत असलेल्या अपघातांचा विषय हाती घेतला आहे. वाढत्या वयामुळे इतकी धावपळ त्यांना शक्‍य होत नाही. मात्र एखादी स्वयंसेवी संस्था किंवा समाजासाठी काही करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींनी ही लढाई पुढे न्यावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी ते पूर्ण मदत करायला तयार आहेत.

परिवहन खाते त्यांच्यावर चिडले आहे. त्यांना आमिष दाखवायचा प्रयत्न पुण्यातील काही अधिकाऱ्यांनी केला होता. न्यायालयाने त्यांना त्यांच्या दाव्याच्या खर्चासाठी सरकारने एक लाख रुपये द्यावेत, असा आदेश दिला. मात्र तो देखील पाळला नसल्याने न्यायमूर्ती ओक यांनी सरकारी वकिलाला सुनावले होते. मात्र सरकारने जे सांगितले ती मी मांडतोय, अशी भूमिका वकिलाने घेतली. कर्वे यांना आरटीओ कार्यालयात धक्काबुक्कीचा प्रयत्न दुखावलेल्या काही लोकांनी केला होता. तरीही कर्वे यांनी आपला बाणा सोडलेला नाही. सामान्य माणसाची ताकद काय असते, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018.....दिनांक 9.12.2018 रोजी होणाऱ्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला ...
08/12/2018

अहमदनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2018.....

दिनांक 9.12.2018 रोजी होणाऱ्या अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला घटनेने दिलेला अधिकार बजावण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे ......आणि हीच वेळ आहे संधीचं सोनं करण्याची ...तसेच आपला आणि आपल्या नगर शहराचा विकास करण्याची....
माझ्या प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो...मी आपणास युगंधर युवा प्रतिष्ठान तर्फे कळकळीची नम्र विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीत कोणाच्याही दबावाला...दडपशाहीला....लाच म्हणून दिल्या जाणाऱ्या पैशाला....बळी न पडता आपणाला असा उमेदवार निवडून द्यायचा आहे...ज्याला आपल्या समस्यांची जाण आहे... जो सुशिक्षित आहे...आपल्यासारख्या सामान्य घरातून आलेला आहे...ज्याला खरोखर आपले प्रश्न सोडवून आपला तसेच नगर शहरा चा विकास करावयाचा आहे...अशाच उमेदवारांना आपल्याला बहुमूल्य अशा प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे...
आत्ता निर्णय घेण्याचे चुकलात तर निर्णय दुरुस्त करायला पुन्हा पाच वर्ष वाट पाहावी लागेल...

🙏आपलाच🙏
एडवोकेट प्रदीप रामदास ढाकणे
अध्यक्ष-युगंधर युवा प्रतिष्ठान अहमदनगर

09/06/2018

युगंधर युवा प्रतिष्ठानने आजपर्यंत नगर शहरामध्ये अनेकानेक समस्या मार्गी लागण्यासाठी विविध आंदोलने केली....
या आंदोलनामुळे नगर शहरातले अनेक समस्या मार्गी सुद्धा लागल्या...
आता युगंधर पुन्हा नव्या जोमाने सामाजिक कार्यामध्ये पुनरागमन करीत आहे...
तरी आता सामाजिक कार्यासाठी साथ हवी आहे शहरातील युवकांची... सामाजिक कार्यामध्ये रस असणाऱ्या युवकांची...
तर चला एकत्र येऊ आणि नव्या जोमाने कामाला लागू....

युगंधर युवा प्रतिष्ठान

04/06/2018

नगर शहराची सध्याची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता युवकांनी विधायक कार्यासाठी संघटित होणे गरजेचे वाटते......
तुम्हाला काय वाटते????

13/05/2018

*Urgently Requirement for Boys and Girls in Fashion Company*
Location :- Pune Maharashtra
Requirement for (Non Technical work) for below
described designation.
1. Company staff-110, Salary-15000-19
000
2. Customer Handling-80, Salary-17000-20
000
3. Fashion Consultant - 50, Salary. 20000-24000.
4. Business promoter - 10, Salary - 25000- 30000
5. Management Department - 5, Salary -
30000-40000
6. Marketing Executive- 8 - 25000 - 30000.
7. Sales Executive- 5 - 19600 - 21000
Qualification- 10th,12th, BBA, MBA, BA, BSc.,
BCom,
BCA,, Btech, MCA, Mcom, Mtech. ( preferred :
BBA, MBA mainly )
Experienced - Fresher.
Note - Selected person will join immediately
**
*Send me your resume on wap :-9657607889 *
*More Info. Call :- *8600472249 *
*Facility : Room Nd Food provided by management department*

30/01/2018

शुभ रात्री....मित्रांनो....

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर युगंधर युवा प्रतिष्ठानने सततचं आवाज उठवीला.... अनेक आंदोलने केली.... विद्यार्थ्यांचे बरेचसे ...
17/11/2017

विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर युगंधर युवा प्रतिष्ठानने सततचं आवाज उठवीला.... अनेक आंदोलने केली.... विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न मार्गीसुद्धा लावले.... प्रतिष्ठानच्या या लढाईत संघर्षाचे अनेक शिलेदार सामील झाले... त्याच शिलेदारांपैकी ठळक दोन नावे म्हणजे... श्री.सुभाष चिंधे सर आणि प्रा.अमोल खाडे.... विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एकाने प्रतिष्ठानला मार्गदर्शन तर केलेच शिवाय प्रसार माध्यमांद्वारे विद्यार्थीविरोधी प्रशासनावर नैतिक दबाव टाकून विद्यार्थीहिताचे निर्णय घेण्यास भागचं पाडले... तर दुस-याने स्वत: मैदानात उतरून विद्यार्थ्यांच्या समस्यांविरोधात नेहमीच आवाज उठविला...नव्हे कित्येक समस्यांचे निराकरण केले .. असे आमचे मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची जाण असलेले चिंधे सर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सतत आवाज उठविणारे व न्याय मिळवून देणारे खाडे सर यावेळी पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुक,2017 साठी लढा देत आहेत... हा लढा विद्यार्थ्यांचा आहे.... आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी युगंधर पुर्ण ताकदीने या दोहोंच्या पर्यायाने विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे.... विजय आपलाचं आहे.... आत्ताचं या दोघांच अभिनंदन....

26/06/2017

माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या मन:स्वी शुभेच्छा......

18/06/2017

# हरलय..... हिंदुस्तान नाही......

जय हिंद......

Address

Aman Patil Road, Dhor Lane, Maliwada
Ahmednagar
414001

Telephone

+919822755005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when युगंधर युवा प्रतिष्ठान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to युगंधर युवा प्रतिष्ठान:

Share