22/07/2026
*वार्षिक सर्वसाधारण सभा नोटीस:-*
*केदारेश्वर सेवाभावी ट्रस्ट, बाभुळवाडे* या संस्थेची *वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ठीक १०.०० वा.* गावातील *केदारेश्वर देवस्थान भक्त निवास सभागृह* या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व विश्वस्त, सभासद व ग्रामस्थांनी कृपया उपस्थित रहावे, हि नम्र विनंती.
*सभेचा अजेंडा व सभेपुढील विषय खालीलप्रमाणे:*
१. अध्यक्षीय निवड करून संस्थेच्या दिवंगत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करणे व मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.
२. दि. ३१ मार्च २०२६ अखेर हिशोबपत्रकास मंजुरी देणे व आर्थिक पत्रके, लेखापरीक्षण अहवाल, जमा-खर्च वाचून दाखविणे.
३. सन २०२६-२७ अखेर अंदाजपत्रकास मंजुरी देणे व वर्षभरातील खालील संभाव्य कामांची चर्चा करणे.
अ) संस्थेला देणगी देणाऱ्या विविध मान्यवरांचे आभार व्यक्त करणे.
ब) वर्षभर अनेक शालेय सहली देवस्थानास भेट देत असल्याने खेळणी, बाल-उद्यान इ. निर्माण करणे.
क) गणपती मंदिर ते देवस्थान ऑफिस जवळील पायऱ्यापर्यंत आर. सी. सी. संरक्षक भिंत बांधणे.
ड) पायथ्याजवळील वळणावर संरक्षक कठडा बसविणे.
फ) देवस्थान परिसरात भगवा ध्वज उभारणे.
ग) पश्चिमेकडील डोंगर पायथ्यालगत सपाटीकरण करून पार्किंग ची व्यवस्था करणे.
ह) उन्हाळ्यातील पाणी टंचाई लक्षात घेता शाश्वत व नवीन पाण्याच्या स्रोताविषयी चर्चा करणे.
य) केदारेश्वर देवस्थान जागेच्या नोंदीबाबत माहिती देणे व पाठपुरावा सुरु ठेवणे.
४. सन २०२६-२०३१ या कालावधीसाठी नवीन विश्वस्त मंडळाची निवड करणे.
५. मा. अध्यक्षांच्या पूर्वपरवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करणे.
*टिप:*
१. गणपूर्ती अभावी सभा तहकूब झाल्यास सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी सभेच्या नियोजित वेळेच्या अर्ध्या तासानंतर घेतली जाईल. अशा तहकूब सभेस गणपूर्तीची आवश्यकता राहणार नाही.
२. संस्थेच्या सभासदांच्या काही सूचना असल्यास त्या दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत संस्थेच्या कार्यालयात अथवा सचिवांकडे लेखी स्वरूपात पाठवाव्यात.