06/12/2020
🔥श्री कालभैरव जंयती 🔥 07/12/2020
🙏🙏 🙏🙏
*श्रीकालभैरवनाथांची सेवा व श्रीकालभैरवष्टक पठणाचे महत्त्व :- *
________
🚩श्री कालभैरव हे महादेवांचेच रुद्रावतार असुन हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे.
🚩आठ दिशांना मुख्य मुख्य आठ आठ क्षेत्र रक्षक भैरव देवता असुन या 8*8=64 भैरवांचे मुख्य अधिनायक दैवत म्हणजेच श्रीकालभैरवनाथ हे होय.
🚩श्रीकालभैरवनाथांची मनोभावे सेवा केल्याने साधकांस त्यांचे पूर्ण संरक्षण लाभते.
🚩श्रीकालभैरवनाथ हे न्यायप्रिय दैवत असुन यांना खोटेपणा चालत नाही, हे मुख्य कोतवाल दैवत आहे.
🚩श्रीकालभैरवनाथांची खोटेपणाच्या कामासाठी कुणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांनाच दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांचे सर्वतोपरी संरक्षण करतात.
🚩श्रीकालभैरवनाथांच्या सेवेत त्यांना विशेष शुद्धजलधारांचा रुद्रभिषेक अतिप्रिय आहे.
🚩श्रीकालभैरवनाथांना बाजरीची भाकरी, लाल लसणाची चटनी, काद्याची पात टाकून केलेले वांग्याचे भरीत, पूराणावरणाचा नैवेद्य अतिप्रिय आहे.
🚩तथा श्रीकालभैरवनाथांच्या सेवेत श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचेही पठण केले जाते. हे स्तोत्र अत्यंत प्रभावी व पावरफुल आहे.
🚩श्रीकालभैरवाषटकस्तोत्राच्या नित्य सेवेत दररोज 11 वेळस पठण करावे.
🚩श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचे नित्यनियमित पठणाने विशालकिर्ती प्राप्त होते, काशीक्षेत्री वास करुन पुण्य अर्जित करण्याचे पुण्य लाभ होतो, धर्म नीतीने वागण्याची बुद्धी-धैर्य तथा तशी परिस्थिती प्रतिकूल होते.
🚩असे हे मनोहारी कालभैरवष्टकाचे नित्य पठण ज्ञान मुक्तिचे साधन असुन विचित्र पणे पुण्य वर्धक जणु एक रहस्यच आहे,
तथा सर्वप्रकारच्या शोकांचा - मोहांचा - दुःखांचा - दैन्याचा - लोभांचा - कोपांचा नाश होतो. असे हे श्रीकालभैरवनाथांच्या नित्य सेवेत श्रीकालभैरवाषटकस्तोत्राचे नित्य पठण केले पाहीजे.
🚩प्रति अमावस्येला श्रीकालभैरवनाथांचा हार, नारळ, खडीसाखर, यथाशक्ती दक्षिणा, त्यांना आवडीचा नैवेद्य. अर्पण करुन, त्यांचा मानसन्मान करावा.
🚩श्रीकालभैरवनाथांचा पूर्णकृपाशिर्वाद प्राप्त होतो,
🚩श्रीकालभैरवनाथांचा बीज मंत्र :-
"ॐ र्हां र्हीं र्हुं रुद्रमुर्तये कालभैरवाय नमः || "--------दररोज 108 वेळा जप करावा.
|| श्रीकालभैरवनाथचरणार्पणमस्तु ||
श्री काळभैरावानाथांना जे वंदन करतात. त्यांना यमदूत वंदन करतात. श्री काळभैरावानाथांचा महिमा जे वाचवतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडेल !!