Shri Gajanan Maharaj {JaI-ShReE-GaJanaN}

Shri Gajanan Maharaj {JaI-ShReE-GaJanaN} This page is dedicated to devotee of Shegaon Nivasi shri gajanan maharaj,well known name in vidharbha region , Maharashtra,India
।।जय गजानन★श्री गजानन।।

Shegaon is a town in the Buldhana District of the State of Maharashtra in India. It is located around 550 km east of the city of Mumbai and 300 km west from the city of Nagpur. It is located on Mumbai-Nagpur route of the Central Railway of Indian Railways. It has acquired fame as a pilgrimage center because Shri Gajanan Maharaj lived there. Hindus consider Shri Gajanan Maharaj a saint with miracul

ous powers. The origins of Gajanan Maharaj are untraceable in history. Shri Gajanan Maharaj took "Samadhi" at Shegaon. Gajanan Maharaj Temple is built on the Samadhi of Gajanan Maharaj at Shegaon. Gajanan Maharaj Sansthan is the biggest temple trust in the Vidarbha region and is so called as "Pandharpur of Vidarbha". It attracts pilgrims from all over the area. Year 2009-2010 is centenary year of Shri Gajanan Maharaj Samadhi. Anand Sagar area is developed by Trust as Spiritual as well as entertainment center for devotees coming to Shegaon

Jai-Gajanan

सतेज दुसरा रवी , हरि समान ज्यांचे बल ।विशिष्ट सम सर्वदा , तदिय यचित्त तेही निर्मल ।असे असूनही खरे वरी-वरी पिसा भासतो ।तय...
28/08/2025

सतेज दुसरा रवी , हरि समान ज्यांचे बल ।
विशिष्ट सम सर्वदा , तदिय यचित्त तेही निर्मल ।

असे असूनही खरे वरी-वरी पिसा भासतो ।
तया गुरू गजानन , प्रति सदा गणू वंदितो ।। 🙏 😇

www.facebook.com/hsdmha✔️

।। जय गजानन माऊली ।। 🙏😇

आज दिनांक २८ ऑगस्ट २०२५ संत शिरोमणी श्री गजानन महाराज, शेगाव यांचा ऋषिपंचमीला ११५ वा संजीवन समाधी दिवस आहे ।

देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले

मी गेलो ऐसे मानू नका। भक्तीत अंतर करू नका। कदा मजलागी विसरू नका। मी आहे येथेच।।
यावरून श्री महाराजांचे भक्तां वरील अपरंपार प्रेमच दिसून येते।
महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे।

श्री महाराज समाधी घेण्यापूर्वी म्हणाले
दुःख न करावे यत्किंचित । आम्ही आहो इथेच तुम्हा सांभाळण्या परी सत्य ।
तुमचा विसर पडणे नसे।।😇🙏

www.facebook.com/hsdmha ✔️

देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदा कार झाले आहेत।
त्या या मुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा प्रेम आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे।

गुरू माऊली
आपली कृपादृष्टी सदैव आपल्या भाविक भक्तांवर अशीच असू द्या हीच श्री चरणी प्रार्थना 🙏 😇

श्री गजानन माऊली हि भक्तांसाठी अमूल्य संपदा आहे।

।। ओम नमो भगवते गजानन नमो नमः ।। ★ ।। गण गण गणात बोते।। ★ ।। श्री गजानन ★ जय गजानन ।।
www.facebook.com/hsdmha✔️

।। गण गण गणात बोते ★ जय गजानन ★ श्री गजानन ।।

जय गजानन माऊली 🙏😇आज दिनांक ८ सेप्टेंबर  २०२४ संत शिरोमणि श्री गजानन महाराज, शेगाव यांचा आज ऋषिपंचमीला ११४ वा संजीवन समाध...
08/09/2024

जय गजानन माऊली 🙏😇

आज दिनांक ८ सेप्टेंबर २०२४ संत शिरोमणि श्री गजानन महाराज, शेगाव यांचा आज ऋषिपंचमीला ११४ वा संजीवन समाधी दिवस आहे । 🙏🏻

देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले होते 😊

मी गेलो ऐसे मानू नका। भक्तीत अंतर करू नका। कदा मजलागी विसरू नका। मी आहे येथेच।।

यावरून श्री महाराजांचे भक्तां वरील अपरंपार प्रेमच दिसून येते महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे।

श्री महाराज समाधी घेण्यापूर्वी म्हणाले

दुःख न करावे यत्किंचित । आम्ही आहो इथेच तुम्हा सांभाळण्या परी सत्य । तुमचा विसर पडणे नसे।।

देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत
त्या मुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा प्रेम आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे। 🧿🤗

गुरू माऊली , आपली कृपादृष्टी सदैव आपल्या भाविक भक्तांवर अशीच असू द्या हीच
आजच्या दिनी आपल्या चरणी प्रार्थना 🙏 😇

श्री गजानन माऊली हि त्यांच्या भक्तांसाठी अमूल्य संपदा आहे। 😇 🙏

https://www.facebook.com/hsdmha

।। ओम नमो भगवते गजानन नमो नमः ।। ★ ।। गण गण गणात बोते।। ★ ।। श्री गजानन ★ 🤗

-harsh_मधुरज़०✍🏻

03/03/2024

श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिवस.
********************

आज श्री संत गजानन महाराज यांचा प्रकट दिवस आहे , त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
शेगावीचे श्री संत गजानन महाराज हे माघ वद्य सप्तमी १८७८ , दिनांक २३.०३.१८७८ शेगाव येथे प्रकट झाले. त्यांचा जन्म कोठून झाला , त्यांचे आईवडील कोण याबद्दल अजून कोणताही ठोस इतिहास किंवा पुरावा उपलब्ध नाही मात्र ते श्री दत्त अवतारी अयोनीज संत म्हणून श्री गजानन महाराजांचे वर्णन केले गेले आहे.

त्यांनी भाद्रपद शुक्ल ऋषी पंचमी दिनांक ०८.०९.१९१० ला शेगाव येथे समाधी घेतली. वऱ्हाडातील शेगाव हे गाव श्री गजानन महाराजांमुळे प्रसिद्ध झाले.

शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव आहे व सध्या हे तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८. श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.

“ गण गण गणात बोते ” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या योगी गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.

कुत्रा, गाय, घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हे ही त्यांनी प्रत्यक्ष दाखविले. भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले.

अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले. श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोहोचलेले महान संत होते.जे मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया अवस्थेमुळे व स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे.

श्री देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते. ते परमहंस योगी होते. त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड, भगवी वस्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती. त्यांनी स्वत:च्या ह्या योगी वृत्तीचा उच्चार अनेकवेळा करुनही दाखविला आहे.

त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस योगी रुपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख "श्रीगजानन विजय "ह्या ग्रंथात आलेले आहेत.
एक दिवस बालअवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळी अक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात पोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटता क्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली, सिध्दपुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत.

अशाप्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले नंतर स्वामींनी बाल गजाननास नाशिकला देव मामलेदारांकडे जावे, असे सांगितले व त्यानंतर, तु आकोटला नरसिंग महाराजाकडे आणि तेथुन शेगावला जाऊन भक्तांचा उध्दार करावा व तेथेच देह सोडावा, असे सांगितले.

प्रस्तुती : श्री वामन रूपरावजी वानरे.

।। जय गजानन ◆ श्री गजानन ।। 🙏🏻

25/02/2024

⁣आज पासून सुरू होत असलेल्या श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिन सप्ताह च्या श्रींच्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा।⠀

आतुरता प्रगट दिनाची⠀
आतुरता ०३-मार्च ची ।⠀

।। माऊली ।। ★ ।। जय श्री गजानन ।।

Address

Gajanan Maharaj Mandir Road
Shegaon
444203

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Gajanan Maharaj {JaI-ShReE-GaJanaN} posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Gajanan Maharaj {JaI-ShReE-GaJanaN}:

Share