26/10/2024
[ पुणे परिसरात नववे हवन कार्य व भगवत कार्याची चर्चाबैठक ]
महानत्यागी बाबा जुमदेवजी द्वारा स्थापित एकमेव एकमात्र मंडळ, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर अंतर्गत बुधवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ ला पुणे परिसरात श्री.धनराज श्यामरावजी मेश्राम यांच्या निवासस्थानी एका भगवंताचे नववे हवनकार्य पार पडले. त्या निमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक आयोजित करण्यात आली होती.
ह्या कार्यक्रमात पुणे, मुंबई, नागपूर, गोंदिया जिल्ह्यातील जवळपास दोनशे सेवक - सेविका व नागरिक उपस्थित होते.
चर्चा बैठकीची सुरुवात महानत्यागी बाबा जुमदेवजी व मातोश्री वाराणसी आई यांच्या फोटो चे स्वागत करून करण्यात आली. पुणे परिसरातील सेविका ताईंनी स्वागतगीत सादर केले. श्री.राजेशजी देवगडे यांनी परमात्मा एक मानवधर्मावर आधारित प्रस्तावना सादर केली. चर्चाबैठकीत मेश्राम कुटुंबीयांनी मार्गात येण्याचा तसेच पुणे मध्ये वास्तव्यास असताना आलेला अनुभव सांगितलं. तसेच श्री. रविंद्र उताणे (मुंबई), श्री. उमेश मचाले (रामटेक, नगरधन), हटवार ताई ( चिंचभवन, नागपूर), श्री. नितीनजी कोहपरे (वाडी, नागपूर), घाटुरले काकू (हिंगणा नागपूर), डॉ. गायकवाड (गोंदिया), श्री.रमेश पचारे (हिंगणा), श्री. रविंद्र राऊत (नागपूर), श्री. जानकीरामजी कुंभारे (मार्गदर्शक, पुणे), श्री. संदीप टाले (नागपूर), श्री. बोरकर काकाजी (नागपूर), श्री. सुरेंद्र चिंतलवार, कु. प्रिया चिंतलवार यांनी अनुभवाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. चर्चा बैठकीचे संचालन श्री. रुपेशजी चकोले तसेच आभार प्रदर्शन श्री. खुमेश बिसेन यांनी केले. सायंकाळची प्रार्थना श्री. राहुलजी निखारे यांनी केली. चर्चा बैठकीच्या समाप्ती नंतर भजनाचा व भोजनाचा सर्व सेवकांनी आस्वाद घेतला.
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी पुणे परिसरातील युवा, बाल सेवक - सेविका यांनी मोलाची मेहनत घेतली. तसेच परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले.
पुणे परिसरात रविवारला पंधरवाडी चर्चाबैठक होत असते. आपल्या ओळखीचे कोणी सेवक पुणे परिसरात राहत असल्यास त्यांना ह्या चर्चाबैठक बद्दल अवश्य माहिती द्या. पुणे परिसरातील पंधरवाडी चर्चा बैठकीच्या माहितीसाठी अवश्य संपर्क करा. नमस्कार