तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया
श्री विघ्नेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराच्या चारही बाजूंना दगडी तटबंदी आहे. तटावरुन चालण्यास पायवाट आहे. देवळाच्या गाभाऱ्यात चारही बाजूंना छोटे छोटे कोनाडे असून त्यात पंचायतनांच्या मूर्ती आहेत. देवळाचा कळस व शिखर सोनेरी आहे.
श्री विघ्नेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख असून , डाव्या सोंडेची , पूर्णाकृती व आसनमांडी घात
लेली आहे. मूर्तीच्या दोन्ही डोळयंत माणके , कपाळावर हिरा आणि बेंबीत खडा बसवलेला आहे. मूर्ती महिरप कमानीत असून दोन्ही बाजूस ऋध्दी-सिध्दीच्या मूर्ती आहेत.
भादपद शुध्द चतुर्थी व माघ शध्द चतुर्थी हे दोन उत्सव इथे साजरे होतात. त्रिपुरीपौणिर्मेला चार दिवसांचा उत्सव असतो
पूणे-जुन्नर मार्गावर नारायणगावच्या सात किलोमिटर पुढे ओझरला जाण्यासाठी फ़ाटा फ़ुट्तो.
कल्याण नगर मार्गावर ओतूरपासून १२ किमी अंतरावर कुक्डी नदीच्या काठावर ओझर गाव वसलेलं आहे . भाद्रपद शुध्द प्रतीपदा ते पंचमी असा हा सोहळा असतो.चारही बाजुने मंदीराला परकोट आहे. मंदीर पुर्वाभिमुख असून त्याचा चारही बाजुंच्या कोनाड्यात पंचाय्तानाच्या मूर्ती आहेत. पळण्याच्या तयारीत असलेली काळ्या पाषाणाची मूषक मूर्ती पण आहे.
गणपतीने पाश्र्वऋषीच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्यांच्या पुत्ररूपाने विघ्नासूराचा नि:पात केला अशी विघ्नेश्वरासंबंधी कथा आहे.
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नांची
नुरवी; पुरवी प्रेम कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची,
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना |
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा वाट पाहे सदना|
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥
***
|| विघ्नहर गणपती || (ओझर)
विघ्नहर (ओझर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला सातवा गणपती म्हणजे ओझरचा विघ्नहर.या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणूनही ओळखले
जाते. विघ्न म्हणजे कार्यात बाधा येणारी बाधा आणि हर म्हणजे दूर करणारा.…
आख्ययिका :
राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सूरू केला.यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली व त्याला यज्ञात विघ्न आणण्यास सांगितले. त्याने एक पायरी पुढे जाऊन सर्वच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरवात केली. यामळे ऋषीमूनींनी विघ्नासूराचा बंदोबस्त करण्याची गणपतीला विनंती केली.
गणपतीने पराभव केल्यानंतर विघ्नासूर गणपतीला
शरण गेला. गणपतीने त्याला जेथे माझी पूजा केली जाते तेथे न येण्याच्या अटीवर सोडून दिले. विघ्नासूराने गणपतीला विनंती केली की तुमचे नाव घेण्याआधी माझे नाव भक्तगणांती घ्यावे व तुम्ही येथेचे वास्तव्य करावे.
विघ्नासूराची ही विनंती गणपतीने मान्य केली व तो या ठिकाणी विघ्नहर या नावाने वास्तव्य करू लागला.
१७८५ मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढविला.
विघ्नहराच्या मंदिराच्या पुढे २० फुट लांब सभागृह असून आतील गाभारा १० बाय १० फुटाचा आहे. मंदिराच्या कडेने मजबूत संरक्षक भिंत आहे. येथील पूर्वाभिमुख मूर्तीच्या कपाळावर नाभीवर हिरे आहेत.
त्रिपुरी पौर्णिमेला येथे चार दिवस मोठा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवा व संकष्टी चतुर्थीला लोक दर्शन घेतात.
पुणे-नाशिक रस्त्यावर जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे.