श्री कल्याण स्वामी मठ परांडा जि.उस्मानाबाद

  • Home
  • India
  • Peth
  • श्री कल्याण स्वामी मठ परांडा जि.उस्मानाबाद

श्री कल्याण स्वामी मठ परांडा जि.उस्मानाबाद Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री कल्याण स्वामी मठ परांडा जि.उस्मानाबाद, shri kalyan swami math , somwar peth, Peth.

https://surveyheart.com/form/66214bce854dc0202ebb201a
18/04/2024

https://surveyheart.com/form/66214bce854dc0202ebb201a

प्रति वर्षी प्रमाणे अखिल भारतीय समर्थ वेणीराम कीर्तन गुरुकुलाच्या माध्यमातून रामदासी पठडिचे नारदिय कीर्तनाचे ....

।। श्री राम समर्थ।।          जय जय रघुवीर समर्थ श्री कल्याण स्वामी पुण्यतिथी उत्सव परंडादि, ११/७/२२ सोमवार आषाढ शुद्ध १३...
10/07/2022

।। श्री राम समर्थ।।
जय जय रघुवीर समर्थ
श्री कल्याण स्वामी पुण्यतिथी उत्सव परंडा
दि, ११/७/२२ सोमवार आषाढ शुद्ध १३।। (मुख्य दिवस)
सकाळी १०-३० वा, स, भ, कौस्तुभ बुआ रामदासी (मठपती वेण्णा स्वामी मठ मिरज) यांचे कीर्तन होईल
हे कीर्तन
समर्थ वेणीराम श्री संत वेणास्वामी मठ मिरज युट्यूब चॅनल वर १०.३० वा live पाहता येईल

कीर्तन श्रवणाचा लाभ घेण्यासाठी लाईक व सबक्राईब करा.

जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ 🚩 #जयश्रीराम
09/04/2022

जय श्रीराम
जय जय रघुवीर समर्थ 🚩
#जयश्रीराम

21/02/2022
समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच...
25/11/2021

समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. समर्थांनी स्थापन केलेल्या केवळ श्री मारूती मंदिरांचा (त्या संख्येचा) अंदाज जरी आपण घेतला, तरी आपल्याला थक्क व्हायला होते. अक्षरश: शेकडो मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत: डोंगरदर्‍यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला. प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला. आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले. हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.

ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे." मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहात नाही. ...
08/11/2021

ज्याच्या घरात समाधान तेथे मी आहे."

मनुष्य मला भेटला की तो सुखी किती आहे हे मी पाहतो, त्याच्या इतर गोष्टी मी पाहात नाही. पण तुम्ही त्याची श्रीमंती, विद्या, मान, यांवरून तो सुखी आहे की नाही हे ठरवता.
भगवंतावाचून मनुष्य कसा सुखी होईल ?

लोकांना श्रीमंत आवडतो तर मला गरीब आवडतो. लोकांना विद्वान आवडतो, तर मला अडाणी आवडतो. असे माझे सगळे जगाच्या उलट आहे.
पण म्हणूनच जगाच्या उलट माझ्याजवळ समाधान आहे. समाधान कशात आणि कुठे आहे याचा मी शोध लावला.

मी समाधानरूपी आहे. ज्याच्या घरात समाधान आहे तिथे मी आहे. जो माझा आहे पण समाधानी नाही, त्याच्याजवळ राहायला मला कष्ट होतात. मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्हीसुद्धा अत्यंत समाधानी राहा की झाले !

आजपर्यंत मी एकच साधन केले: कुणाचे मन दुखवले नाही, आणि एका नामावाचून दुसर्या कशाचीही आठवण ठेवली नाही.

माझ्याजवळ काय आहे ते सांगा ! विद्या नाही, पैसा नाही, किंवा कला नाही. पण सर्वांवर मी अत्यंत निष्कपट प्रेम करतो, त्यामुळे लोकांना मी हवासा वाटतो आणि त्यांना माझा आधार वाटतो.

जगाचा स्वभाव मला पक्का माहीत आहे; म्हणून आजपर्यंत मला कोण काय म्हणतो हे मी पाहिले नाही, मी त्याला काय सांगायचे एवढेच मी पाहिले.

माझे सांगणे ऐकल्यानंतर पुनः तुम्ही ऐकायला येता, याची तीन कारणे असू शकतील. एक, मला चांगले सांगता आले नसेल; दुसरे,तुम्हाला ते समजले नसेल; किंवा तिसरे, सांगितलेले तुम्ही विसरला असाल.

तुम्ही माझ्याशी अगदी स्वाभाविक रीतीने बोलावे; आपण आपल्या घरातल्या माणसांशी जसे बोलतो तसे अगदी आपलेपणाने माझ्याशी बोलावे.
पण माझ्याशी कुणी कसाही आणि काहीही बोलला तरी मला जे सांगायचे तेच मी त्याला सांगत असतो.

मी एखाद्याला सांगत असताना, 'याने माझे ऐकले तर याचे कल्याण होईल' असे आपोआपच माझ्या मनात येते. माझे जो ऐकेल त्याचे खास कल्याण होईल याची मला खात्री असते.
पण कल्याण म्हणजे प्रपंचातली सुधारणा नसून, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने राहणे होय.

माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असे नाही; पण त्याचा प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मी मदत करणार नाही. अशी केली नाही तर तो रडेल, त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल, पण तो जगेल हे मात्र निश्चित होय; आणि जगल्यावर आज ना उद्या तो नाम घेईल. रोगी मेल्यानंतर त्याला औषध देऊन काय उपयोग आहे ? मी एकदा बीज पेरून ठेवतो. आज ना उद्या त्याचे झाड झाल्याशिवाय राहणार नाही.
आजपर्यंत मी नामाशिवाय दुसरे काही सांगितलेच नाही. जो मला भेटायला येतो त्याच्या तोंडातून नाम घेववण्याचे माझ्याकडे लागले.

सद् शिष्य कसा असावा ?सद्गुरु ची लक्षणे सांगून झाल्यावर समर्थ सद् शिष्याची लक्षणे सांगतात .परमार्थात सद्गुरु व सद् शिष्य ...
31/10/2021

सद् शिष्य कसा असावा ?

सद्गुरु ची लक्षणे सांगून झाल्यावर समर्थ सद् शिष्याची लक्षणे सांगतात .परमार्थात सद्गुरु व सद् शिष्य यांची सांगड
होणे महत्वाचे असते कारण -
सद्गुरुविण सद् शिष्य । ते वाया जाय निशेष । का सद् शिष्येविण विशेष । सद्गुरु शिणे। । ५ -३ -२ । । सद् शिष्याला सद्गुरु भेटला नाही तर तो पूर्ण वाया जातो .तसेच सद्गुरुला सद् शिष्य भेटला नाही तर सद्गुरुला श्रम
होतात .ही गोष्ष्ट स्पष्ट करण्यासाठी ते भूमीचा दृष्टांत देतात .भूमी उत्तम आहे ,पण बी किडके आहे तर पीक येत नाही ,किंवा बी उत्तम आहे पण जमीन खडकाळ आहे तरी पीक येत नाही .
सद् शिष्य ही उत्तम भूमी ,तर सद्गुरु उत्तम बी सारखा .शिष्य अनाधिकारी ,अपात्र असेल तर सद्गुरुला फुकट श्रम होतात .जेव्हा सद्गुरु व सद् शिष्य एकत्र येतात तेव्हा सद्गुरूंना वाटत की हाच तो ज्याची मी वाट पाहात
होतो .रामकृष्ण परमहंसांना विवेकानंदांना पाहून असच वाटल,श्री समर्थांना कल्याण स्वामींना पाहून असेच वाटले सद्गुरु ,सद् शिष्य आहेत पण अध्यात्म निरूपण नसेल उपयोग होत नाही ,जसे पीक तयार होउन आले तरी त्याची निगा राखावी लागते .त्याप्रमाणे आत्मज्ञान झाले तरी साधन चालू ठेवावे लागते .कारण साधन नसेल तर अविद्येचा अंमल होतो .
म्हणौन साधन अभ्यास आणि सद्गुरु । सद् शिष्य आणि सद्शास्त्र विचारू ।
सत्कर्म सद्वासना पारू । पाववी भवाचा । । समर्थ म्हणतात ,'साधन ,अभ्यास ,सद्गुरु ,सद् शिष्य ,सद्शास्त्र विचार सत्कर्म सद्वासना या सर्व गोष्टी एकत्र असतील तरच भवसागर पार करून जाता येइल .
आता समर्थ सद् शिष्याचे लक्षण सांगत आहेत ,
मुख्य सद् शिष्याचे लक्षण । सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण । अनन्य भावे शरण । या नाव सद् शिष्य । । ५ -३ -१९ । ।
सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास ,व सद्गुरुला अनन्य भावे शरण जाणे ही सद् शिष्याची लक्षणे आहेत .कल्याण स्वामी सारखे शिष्य सद्गुरुंच्या केवळ 'कल्याणा छाटी उडाली 'या शब्दाखातर उंच कड्यावरून छाटी पकडण्यासाठी उडी घेतो तेव्हा तो जीवाचा विचार करत नाही ,सद्गुरूंनी सांगितले ते करायचे एव्हडेच त्याला माहीत !

सद् शिष्य कसा असावा ?

शिष्य निर्मल अंत :करणाचा ,आचारशील-आचाराने शुद्ध ,शुद्ध चारित्र्याचा ,विरक्त-हवे नको पण संपलेला , अनुतापी-झालेल्या चुकांबद्दल पश्चाताप वाटून त्या चुका पुन्हा न करणारा ,निष्ठावंत-सद्गुरु वचनावर पूर्ण विश्वास ठेवणारा ,सुचिश्मंत -ज्याची मती म्हणजे बुध्दी अतिशय शुद्ध आहे असा ,नेमस्त -नित्य नेम पाळणारा,साक्षपी -प्रयत्न करणारा ,परम दक्ष-अतिशय सावध ,अलक्षी लक्षी -अतींद्रिय वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याचे मनोबल असणारा ,परोपकारी-दुस-याला मदत करणारा ,निर्मत्सरी-कोणाचाही मत्सर ,द्वेष न करणारा ,अर्थांतरी प्रवेशकर्ता -ग्रंथाचा अभ्यास करताना शब्दार्थाच्या अंतरंगात शिरणारा ,नीतिवंत -चांगल्या वाईटाचा विचार करणारा ,युक्तिमंत -हिकमती ,बुध्दीमंत -बुध्दीमान् ,सद्विद्येचा -उत्तम लक्षणांचा ,निर्लोभी ,निराभिमानी ,अनासक्त अशा गुणानी युक्त असावा .
सद् शिष्य कसा नसावा ?
अविवेकी नसावा ,गर्भश्रीमंत नसावा ,अविश्वासी नसावा .कारण -
अविश्वासे कास सोडिली । ऐसी बहुतेक भवी बुडाली । नाना जळचरे तोडिली । मध्येच सुख दु:खे । । ५ -३ -३७ । ।
या कारणे दृढ़ विश्वास । तोचि जाणावा सद् शिष्य ।मोक्षाधिकारी विशेष । आग्रगण्यु। । ५ -३ -३८ । ।

धर्मजागृतीतून स्वराज्य स्थापना (समर्थ स्मरण श्रीसमर्थ रामदासस्वामी हे आपल्या सगळ्या संतपरंपरेत त्यांच्या वेगळेपणामुळे उठ...
28/10/2021

धर्मजागृतीतून स्वराज्य स्थापना (समर्थ स्मरण

श्रीसमर्थ रामदासस्वामी हे आपल्या सगळ्या संतपरंपरेत त्यांच्या वेगळेपणामुळे उठून दिसतात. ज्या काळात महाराष्ट्र मोगलांच्या आक्रमणामुळे हतबल झाला होता. जनसामान्यांमध्ये लोकजागृतीची जाणीव करून देणे अत्यावश्यक होते, त्या काळात श्रीसमर्थांनी देश आणि धर्म याबद्दलचा अभिमान लोकमानसात चेतवला.

वन्ही तो चेतवावा रे । चेतविताच चेततो । ।

हे आपलेच म्हणणे समर्थांनी प्रत्यक्ष कृतीने खरे करून दाखविले. समर्थांच्या आधीच्या काळात आणि समर्थांचे समकालीन असे जे संत-सज्जन होऊन गेले त्या सर्वांचा भर ईश्वरोपासना, योग, समाधी, स्वर्गप्राप्ती, मोक्ष किंवा कर्मकांड अशा गोष्टींकडे विशेष होता. त्यांना परमेश्वराच्या प्राप्तीची तीव्र ओढ लागून राहिली होती. समर्थांना ही ओढ नव्हती असे नाही, पण त्याचबरोबर देव, धर्म नीटपणे चालवावयाचा असेल तर राज्य – शासन परकीय असून चालणार नाही, ते आपलेच पाहिजे आणि आपले म्हणजे आपल्या धर्माबद्दल अभिमान बाळगणारे असले पाहिजे ही गोष्ट समर्थांनी बरोबर हेरली होती, असे दिसते. म्हणूनच समर्थ हे संतपरंपरेत वेगळे दिसतात असे म्हटले. समर्थांनी देव, धर्म या विषयांना दिलेली राष्ट्र भक्तीची जोड पुढील काळात निर्माण झालेल्या संतांनी तेवढ्या प्रमाणात दाखविलेली दिसत नाही. म्हणूनच पारमार्थिकांनी रामदासांचा पराभव केला, असेही काही विचारवंत म्हणतात. समर्थांना महाराष्ट्र हा सद्‌गुणपंडित झालेला पाहावयाचा होता. त्यांना महाराष्ट्र राज्य जिकडेतिकडे व्हावे, अशी प्रेरणा द्यावयाची होती. या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी ज्ञानसंपन्न असावेत, गुणसंपन्न असावेत, अशी आंतरिक तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
म्हणूनच

उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनास सिकवावे । उदंड समुदायें करावे । परी गुप्तरूपें । ।

असे त्यांनी दासबोधाच्या अकराव्या दशकाच्या दहाव्या समासात म्हटले. मोगलांची बेरकी नजर .आणि मोगलांच्या ताटाखालची मांजरे झालेल्या आपल्याच भाऊबंदांची सततची कटकारस्थाने ह्यामुळे जे काही करावयाचे ते गुप्तरूपे केले पाहिजे हा समर्थांचा कटाक्ष होता. म्हणूनच ‘ गुप्त ते गुप्त जाणावे, आनंदवनभुवनी ’ असे त्यांनी बजावले. समर्थांना लागलेला महाराष्ट्राच्या कल्याणाचा ध्यास, समर्थांना वाटणारी स्वातंत्र्याची आस ही इतकी तीव्र होती की, त्याच काळात शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्याच्या आनंदोत्सवात समर्थ प्रसन्नचित्त झालेले दिसतात. शिवाजी महाराज आणि समर्थांचे संबंध नेमके कसे होते त्याचा विशेष तपशील इतिहास आपल्याला सांगत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे समर्थांचे पट्टशिष्य होते इथपासून समर्थांची व शिवाजी महाराजांची भेटच झाली नव्हती इथपर्यंत मतमतांतरे नमूद झालेली आहेत. समर्थांनी आणि तत्कालीन समर्थ पंचकातील इतर संत, तसेच तुकोबांसारखे श्रेष्ठ विठ्ठलभक्त यांनी जी धर्मजागृतीची पार्श्वभूमी तयार केली होती, हिंदू धर्माबद्दल जो अभिमान जनसामान्यांच्या मनात निर्माण केला होता, चेतविला होता त्याचा फायदा निश्चितपणे हिंदुपदपातशाही निर्माण होण्यात झाला असला पाहिजे याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.
समर्थांना आणि त्यांच्या काळातील इतर संतांना किमान एवढे श्रेय निर्विवादपणे देता येते आणि हे श्रेय फारच महत्त्वाचे आहे. मोगलांच्या आततायी छळाला तीव्र विरोध करण्याची प्रबळ शक्ती या शिकवणूकीतून सर्वांना प्राप्त झाली आणि त्यामुळेच शिवप्रभू करीत असलेले कार्य हे देवाधर्माचे कार्य आहे ही श्रद्धा माणसामाणसांच्या मनात दृढावली हे कोण नाकारू शकेल? समर्थांनी त्या काळात जनसामान्यांसमोर आदर्श ठेवला तो प्रभुरामचंद्र आणि महाबली हनुमान यांचा. हाच आदर्श लोकांसमोर ठेवण्यात समर्थाचा काही विशेष उद्देश असेल काय?

🌻 श्री समर्थ रामदास स्वामी शिष्य कल्याण स्वामी कथा         🌼🌼 *डाळगप्पू.* 🌼🌼     🌻 सज्जनगडावर जी तळी आहेत त्यांना जिवंत ...
27/10/2021

🌻 श्री समर्थ रामदास स्वामी शिष्य कल्याण स्वामी कथा

🌼🌼 *डाळगप्पू.* 🌼🌼

🌻 सज्जनगडावर जी तळी आहेत त्यांना जिवंत पाण्याचे झरे नाहीत.पावसाळ्यात साठलेले पाणी वर्षभर वापरावे लागते.अशा पाण्यामुळे कफ वाढू शकतो.गडावर येण्यापूर्वी समर्थांना कफाची व्यथा होतीच.वैद्याने जिवंत पाणी वापरण्याचा सल्ला दिला. सज्जनगडापासून सर्वात जवळचे जिवंत पाण्याचे स्थान म्हणजे उरमोडी नदी.गडाच्या पायथ्याला असलेल्या परळी गावापासून ही नदी अडीच कि.मी.अंतरावर आहे.समर्थां साठी रोज दोन हंडे पाणी आणण्याची जबाबदारी कल्याणस्वामींनी स्विकारली.गुरु सेवेची उत्तम संधी मिळाल्याने त्यांना आनंद झाला.दोन भले मोठे हंडे घेऊन कल्याण उरमोडी नदीवर जाऊ लागले.व येताना भरलेल्या हंड्याची कावड करुन रोज पाणी आणू लागले.एक दिवस समर्थ गडाच्या तटावर उभे राहून किल्याचे निरीक्षण करीत आसता कल्याणस्वामींना पाणी आणतांना त्यांनी पाहीले.कल्याणाच्या अंगाला घामाच्या धारा लागल्या होत्या.भुकेने व उन्हाने चेहरा काळवंडलेला होता.कल्याणाची काहींतरी न्याहरीची व्यवस्थाकेली तरच त्याची प्रकृती उत्तम राहील असा विचार करुन समर्थ कोठीवाल्याकडे गेले व त्यांनी कोठीवाल्याला कल्याणांना रोज सकाळी दोन शेर हरभऱ्याची डाळ,अर्धा शेर गुळ व पावशेर साजूक तूप देण्यास सांगितले.त्यानंतर त्यांनी कल्याणाला बोलावून घेतले व प्रकृती उत्तम रहाण्यासाठी दिलेला शिधा न्याहारीसाठी वापरण्यास सांगितले.दुसऱ्या दिवसापासून कल्याणस्वामींना रोज शिधा सुरु झाला.त्या मुळे बाकीच्या शिष्यांच्या पोटात दुखू लागले.माणसाने स्वतः जास्त खाल्ले तर त्याचे पोट दुखतेच,पण दुसऱ्याला भरपूर खायला मिळालेले पाहून त्याचे पोट दुखू शकते. कल्याणांना जास्तीचा शिधा मंजूर झाला म्हणून सारे जण त्यांना डाळगप्पू असे म्हणू लागले.खरतर त्यांच्या तोंडावर बोलायची कोणाचीच ताकद नव्हती.
🌻 "आता हा डाळगप्पूच पहा !" केवळ ढोर मेहनत आहे.भरमसाठ खायच आणि गुरासारख राबायचं,कधी जप करणे नाही,दासबोध वाचन नाही,अशा दिनचर्येने त्याच कधीही सार्थक होणार नाही."ही शिष्यांची चर्चा समर्थांच्या कानावर गेली.एक दिवस सायंकाळी मठाच्या अंगणात शिष्यांशी गप्पा मारता मारता समर्थ म्हणाले *"तुमच्या पैकी दासबोधाची सर्वात जास्त पारायणे कोणी केली आहेत.?"*सगळे शिष्य एकाच वेळी गलका करुन आपली पारायणसंख्या सांगू लागले.यात एकावन्न पासून अकराशे पारायणे पूर्ण करणाऱ्या शिष्यापर्यंतचा सर्वांचा समावेश त्यात होता.
🌻 *"ऐसा सद्गुरु पूर्णपणी"*पहिला चरण असलेली ओवी मला संपूर्ण आठवत नाही,तेव्हा ती ओवी कोण सांगू शकेल ?" सारे शिष्य गडबडले.अगदी अकराशे पारायणे झालेल्यासुध्दा लज्जायमान होऊन गप्प बसला.तेवढ्यात समर्थांनी कल्याणास हाक मारली व तीच ओवी विचारली तेव्हा कल्याण तात्काळ म्हणाले *"स्वामीजी,ऐसा सद्गुरु पूर्णपणी ! तुटे भेदाची कडसणी ! देहाविण लोटांगणे ! तया सद्गुरुसी !!" ही ओवी सातव्या दशकातील पहिल्या समासात अठरावी आहे."* कल्याण चुकला असेल म्हणून शिष्यांनी दासबोध काढून,पाहीला संपूर्ण बरोबर होती. समर्थांनी विचारले "कल्याणा,तुझी किती हजार पारायणे झाली." हात जोडून कल्याण म्हणाले "स्वामीजी, आपल्या कृपेने एकच पारायण मनापासून घडले." बरं ते जाऊ दे अलिकडे डाळगप्पू नावाचा कुणी साधक आला आहे काय ? हा डाळगप्पू कोण ? कल्याण म्हणाले "स्वामीजी ,जीव,शीव,माया,ब्रह्म,सुख-दुःख ही दोन दळं जो गप्प करुन टाकतो सदैव अद्वैत बोधात राहतो तो डाळगप्पू होय.मात्र ही व्यक्ति माझ्या पाहण्यात आली नाही."
🌻 कल्याणस्वामींच्या या उत्तराने सारे शिष्य खजील झाले.आपली चूक त्यांच्या लक्षांत आली,नंतर समर्थांनी अगदी खरमरीत शब्दांत सर्वांची हजेरी घेतली.व सर्व शिष्यांना सांगितले "उगीच नुसती पारायणे करु नका.दासबोध हे तंत्र आहे त्याचा मंत्र बनवू नका.शांतपणे वाचून अर्थ समजून घ्या.दासबोध जगायला शिका.कोणाची निंदा नालस्ती द्वेष करु नका."

🌻🙏🌻

आईचा लाघवी लेक (समर्थ स्मरण )परिभ्रमण चालू असतांना अंबाजोगाई येथे समर्थ एका देवळात कीर्तन करीत होते. त्यांच्या कीर्तनाला...
21/10/2021

आईचा लाघवी लेक (समर्थ स्मरण )

परिभ्रमण चालू असतांना अंबाजोगाई येथे समर्थ एका देवळात कीर्तन करीत होते. त्यांच्या कीर्तनाला योगायोगाने जांब गावचे एक वृद्ध गृहस्थही आले होते. समर्थांची कीर्ती, त्यांची वाणी, रूप हे सारे पाहून त्या गृहस्थांना वीस-बावीस वर्षांपूर्वी बोहल्यावरून पळून गेलेल्या ठोसरांच्या नारायणाची आठवण झाली. थोडी शंका येऊन त्यांनी कीर्तन संपल्यावर समर्थांना सरळ ‘ मूळ कुठले?’ म्हणून विचारले. समर्थांनी जांब गावचा म्हणून सांगताच त्या गृहस्थांनी रागावून तुमचे ठीक चालले आहे. पण तिथे तुमच्या आईने तुमच्या वियोगाने जो आक्रोश केला त्यात तिचे डोळेदेखील गेले. मागाहून हवे तिकडे जा, पण आता आधी एकदा आई ला भेटून जा, असा उपदेश केला.त्या गृहस्थांकडून घरची हकिगत कळल्यावर समर्थ मातृप्रेमाच्या ओढीने मार्गात कुठेही न थांबता तडक जांब गावी येऊन पोहोचले.
साधारण बत्तीस-तेहतीस वर्षांचे वय, सूर्यनमस्काराने बलदंड, बांधेसूद झालेले असे समर्थ वीस-एकवीस वर्षांनंतर घरी आले होते. आईच्या ओढीने ते घराच्या दारापर्यंत आले खरे, पण एकदम घरात न जाता दारात उभे राहून त्यांनी खणखणीत आवाजात एक स्वरचित श्लोक म्हणून जय जय रघुवीर समर्थ । असा रघुवीराच्या नावाचा जयजयकार केला. पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून पुन्हा दोन श्लोक म्हटले. पण आई मुलाचा बदललेला आवाज ओळखू शकली नाही. मात्र तिने आपल्या सुनेला म्हणजे समर्थांचे वडीलबंधू श्रेष्ठ यांच्या पत्नीला, ‘ बाहेर गोसावी आला आहे त्याला थोडी भिक्षा घालून ये ‘ असे निर्विकार मनाने म्हटले. समर्थांनी आईचे ते उद्‌गार ऐकले आणि ‘ हा गोसावी भिक्षा घेऊन जाणाऱ्यांपैकी नाही ’ असे गदगदल्या स्वरात सांगितले. त्याबरोबर आईला आपल्या लाडक्या लेकाची ओळख पटली. माझा नारायण आला की काय? असे आनंदाने आई विचारीत असतानाच समर्थांनी आत येऊन तिच्या पायावर आपले मस्तक ठेवून ‘ होय आई, मी नारायण आलो आहे, ’ असे उत्तर दिले.
माय-लेकरांनी आपल्या भावनांना अश्रूंच्या साहाय्याने मोकळीक दिली. काही वेळाने भानावर येऊन आई आपल्या लेकराला हाताने चाचपडून पाहू लागली. कारण लेकाच्या वियोगाने रडून रडून तिची दृष्टी गेली होती. समर्थांचा वज्रदेह हातानेच अनुभवून आई हताशपणे म्हणाली, ‘ नारायणा, तुझे हे रूप बघू तरी कसे? डोळेच नाहीत ना मला आता. ‘ आईचे हे उद्‌गार नारायणाच्या काळजाला भिडले. आपण गृहत्याग केल्यामुळे रडून रडून मातेचे डोळे गेले, हे समजून तै अंतर्बाह्य गलबलले. मनाच्या तशा व्याकुळ अवस्थेत समर्थांनी आईच्या डोळ्यांवरून आपला समर्थ हात फिरविला आणि काय आश्चर्य! आईला दृष्टी आली. नव्याने दृष्टी लाभलेल्या आईने कौतुकाने आपल्या या लाघवी लेकाला न्याहाळीत विचारले, ‘ हा चमत्कार कसा केलास रे बाबा? ही भूतचेष्टा कुठे शिकलास?’ त्यावर समर्थ उत्तरले,

सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय ।
रामदास नित्य गाय । तेंचि भूत गे माये । ।
हे भूत म्हणजे प्रत्यक्ष रामराजाच बरं का आई!
होतें वैकुंठीचे कोनीं । शिरलें अयोध्याभुवनीं । लागे कौसल्येचे स्तनीं । तें चि भूत गे माये । ।
त्यानंतर समर्थ काही काळ घरी राहून सर्वांना वीस वर्षांचे स्वत चे अनुभव कथन करून आईची, वडीलबंधूंची परवानगी घेऊन, गावकऱ्यांचा निरोप घेऊन लोककल्याणार्थ पुन्हा भ्रमंतीस निघाले. उपलब्ध माहितीप्रमाणे त्यानंतर पुढे पुन्हा एकदा ते जांब गावी आले होते. जांब येथे ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता त्याच ठिकाणी १८५४ च्या चैत्र शुद्ध नवमीला भव्य मंदिर उभारून त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गेली.
समर्थांचे एकूण चरित्र बघता राणूबाईच्या या लाघवी लेकराने केवळ आपल्या आईलाच पुनर्दृष्टी प्राप्त करून दिली असे नव्हे तर महाराष्ट्र-मातेच्या लेकरांनाही नवी दृष्टी प्राप्त व्हावी, स्वत्व विसरलेल्या त्यांच्या डोळ्यांवरचे ‘ मळभ ’ दूर व्हावे म्हणून भीम-प्रयत्न केले

आज घटस्थापना, म्हणजेच शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस... घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
07/10/2021

आज घटस्थापना, म्हणजेच शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस...
घटस्थापना आणि नवरात्रोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!

Address

Shri Kalyan Swami Math , Somwar Peth
Peth
413502

Telephone

+919960101991

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री कल्याण स्वामी मठ परांडा जि.उस्मानाबाद posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share