Dhamma Padyatra - धम्म पदयात्रा

Dhamma Padyatra - धम्म पदयात्रा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dhamma Padyatra - धम्म पदयात्रा, Religious organisation, Parbhani.

दीक्षाभूमी नागपूर ते लेह-लडाख पर्यंत दुसरी भव्य बौद्ध धम्म पदयात्रा बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुरु झाली.    दि.5 मे 20243 रो...
06/05/2023

दीक्षाभूमी नागपूर ते लेह-लडाख पर्यंत दुसरी भव्य बौद्ध धम्म पदयात्रा बुद्ध पौर्णिमेनिमित्त सुरु झाली.
दि.5 मे 20243 रोजी नागपूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे यात्रे मध्ये सहभागी होणारे भारतीय श्रामनेर भिख्खू संघाला थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिख्खू संघाने श्रामनेर दीक्षा देण्यात आली. ही यात्रा 80 दिवसीय बौद्धधम्म पदयात्रा असून या मध्ये थायलंड येथील आंतरराष्ट्रीय 110 भिख्खू व 100 भारतीय श्रामनेर भिक्खू सहभागी आहेत.या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आयोजक मा.डॉ.सिध्दार्थजी हत्तीअंबीरे यांनी भारतीय श्रामनेर भिख्खू संघाला धम्म पद यात्रेच्या नियोजन व इतर बाबीत सविस्तर मार्गदर्शन करून पुढील धम्म पद यात्रेसाठी हार्दिक मंगल कामना देण्यात आली. या प्रसंगी गगन मलिक, राजेश लाडे, भन्ते रुपेश, नितिन गजभिये,डॉ.बी.टी. धुतमल, भीमराव शिंगाडे,भूषण कसबे, अक्षय जगताप आमोल धाडवे मंचक खंदारे व उपासक बांधव उपस्थित होते.
#धम्मपदयात्रा #नागपूर

भव्य बौद्ध धम्म पदयात्रा परभणी ते चैत्यभूमी दादर मुंबई पहिल्या धम्म पदयात्रेच्या सहभागी व आयोजनात सक्रिय योगदान देणाऱ्या...
07/03/2023

भव्य बौद्ध धम्म पदयात्रा परभणी ते चैत्यभूमी दादर मुंबई पहिल्या धम्म पदयात्रेच्या सहभागी व आयोजनात सक्रिय योगदान देणाऱ्या व आमच्या सोबत प्रत्यक्ष धम्म पदयात्रेत परभणी ते चैत्यभूमी, मुंबई पर्यंत 570 किलोमीटरचे अंतर चालून आपले सक्रिय योगदान देणाऱ्या बौध्द उपासक-उपसिका, सामाजिक कार्यकर्ते यांचा ज्ञानोपासक महाविद्यालयाचे मैदान,जिंतूर रोड परभणी येथे भव्य "धम्मपदयात्री सन्मान सोहळयाचे" आयोजन करण्यात आले होते. या सोहळयात सर्व मान्यवरांचा व धम्म पदयात्रींचा यथोचित सन्मान करण्यात आला.या सन्मान सोहळ्यास आपल्या वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मन:पूर्वक आभार!

आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ थायलंड येथील 110 भिक्खूंचा सहभाग व थायलंड येथील बुद्धांच्या पवित्र अस्थिकलश असलेल्या देशा...
05/03/2023

आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ थायलंड येथील 110 भिक्खूंचा सहभाग व थायलंड येथील बुद्धांच्या पवित्र अस्थिकलश असलेल्या देशातील पहिल्या धम्म पदयात्रेत आमच्या सोबत परभणी ते चैत्यभूमी दादर मुंबई पर्यंत 570 किलोमीटर चालणारे धम्म पदयात्री व विविध सामाजिक संस्था, संघटना व महिला मंडळांच्या अध्यक्षा तसेच या अविस्मरणीय पदयात्रेच्या संपूर्ण आयोजनात सहभागी असणाऱ्या मान्यवरांच्या सर्वां प्रती कृतज्ञतेच्या भावनेने आज दि. 5 मार्च 2023 रोजी सायंकाळी 5:00 वाजता ज्ञानोपासक महाविद्यालयाचे मैदान,जिंतूर रोड परभणी येथे "धम्मपदयात्री सन्मान सोहळयाचे" व महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमगीत गायक अनिरूद्ध बनकर यांच्या भीमगीत संगीत रजनीचे आयोजन केले आहे.या सन्मान सोहळ्यास परभणी शहर व पंचक्रोशीतील सर्व बौद्ध उपासक-उपासिकांनी उपस्थित रहावे ही विनंती.तसेच धम्म पदयात्रीच्या सन्मान सोहळ्यास आपल्या वर्तमानपत्रातून प्रसिद्धी दिल्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मन:पूर्वक आभार!.........................................
डॉ.सिध्दार्थ हत्तीअंबीरे

*नालंदा विपश्यना केंद्राचे  मन:पूर्वक आभार..!*----------------------------------------------नालंदा विपश्यना केंद्र रविरा...
20/02/2023

*नालंदा विपश्यना केंद्राचे मन:पूर्वक आभार..!*
----------------------------------------------
नालंदा विपश्यना केंद्र रविराज पार्क परभणी येथे काल धम्मपद यात्रा आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.सिध्दार्थ जी हत्तीअंबीरे यांनी भेट दिली असता तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेस अभिवादन करून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाचे दर्शन घेऊन अभिवादन केले .
परभणी ते चैत्यभूमी थायलंड येथील ११० भंतेजीचा सहभाग असलेली ५७० किलोमीटर भव्य बौद्ध धम्म पदयात्रा यशस्वी केल्याबद्दल धम्म पदयात्रेचे आयोजक या नात्याने मा.डॉ. सिद्धार्थ जी यांचा नालंदा विपश्यना केंद्र व धम्मज्योती महिला मंडळाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच धम्म पदयात्रेत नालंदा विपश्यना केंद्राचे पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदवला त्या बद्दल सर्वाचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले.

*ऐतिहासिक धम्म पदयात्रेत सहभागी थायलंडच्या 110 भिक्खूंच्या धम्म निष्ठेला त्रिवार वंदन...                   अंत:करणपूर्वक...
18/02/2023

*ऐतिहासिक धम्म पदयात्रेत सहभागी थायलंडच्या 110 भिक्खूंच्या धम्म निष्ठेला त्रिवार वंदन... अंत:करणपूर्वक आभार..!*
=================
महाराष्ट्रात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ थायलंड येथील 110 भिक्खूंचा सहभाग असलेली देशातील पहिली धम्म पदयात्रेचे आम्ही आयोजन केले होते. दि.17 जानेवारी 2023 रोजी परभणी येथून अत्यंत उत्साहात आणि धम्ममय वातावरणात निघाली. थायलंड येथील 110 भंतेजी सलग 30 दिवस 570 किलोमीटरचे अंतर पायी चालले. त्यांना प्रचंड त्रास झाला. पायांना जखमा झाल्या. चालणे अशक्य झाले परंतु केवळ आणि केवळ बुद्धा प्रती असलेल्या निस्वार्थ श्रद्धेपोटी ते चालत होते. त्यांचा त्याग पाहून आम्हालाही धम्म निष्ठा काय असते हे दिसून आले. मी ही माझ्या परीने भदंतांची सेवा करण्यात कसलीच उणीव न ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यांच्या खाण्यापिण्याची, विश्रामाची व वैद्यकीय सेवेची उत्तम सोय करण्यात आली होती. माझ्यासाठी हे दिवस अनमोल होते हा एक महिना थायलंड येथील भिक्खू संघाच्या सानिध्यात राहून मला धम्माचा विचार आणि विनय समजून घेता आला, याच्यापेक्षा पुण्यदायक गोष्ट आणखीन कोणती असू शकेल? माझ्या हातून घडलेल्या कुशल कर्माचे फलितच होते की मला थायलंडच्या भिक्खू संघाचा सहवास लाभला, त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. आयोजक म्हणून थायलंडच्या भिक्खू संघाने आम्हाला कसलाच त्रास दिला नाही. आमची सेवा गोड मानून घेतली त्याबद्दल मी भिक्खू संघाचा आभारी आहे. सर्व भिक्खूंचे आभार मानतो..धन्यवाद देतो.
*नमो बुद्धाय...जय भीम.!*...................................
डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे
आयोजक भव्य बौद्ध धम्म पदयात्रा,
अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभाग

भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचा परभणी ते दादर चैत्यभूमी असा 570 किलोमीटरचा प्रवास करून थायलंड येथील 110 बोद्ध भिक्खू आणि तथाग...
16/02/2023

भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचा परभणी ते दादर चैत्यभूमी असा 570 किलोमीटरचा प्रवास करून थायलंड येथील 110 बोद्ध भिक्खू आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थीधातु कलश घेऊन निघालेल्या ऐतिहासिक बौद्ध धम्म पदयात्रेच्या समारोपाची सवंग प्रसिद्धी दिल्याबद्दल मुंबईतील मराठी,हिंदी,इंग्रजी,गुजराती भाषेतील सर्व वृत्तपत्र,सोशल मीडिया,इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तसेच त्यांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक धन्यवाद..

आपलाच
डॉ सिद्धार्थ हत्तीअंबीरे
आयोजक तथा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस अनुसूचित विभाग

*ऐतिहासिक बौद्ध धम्म पदयात्रा उदंड प्रतिसाद देत यशस्वी केल्याबद्धल सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद..!*==============केल...
16/02/2023

*ऐतिहासिक बौद्ध धम्म पदयात्रा उदंड प्रतिसाद देत यशस्वी केल्याबद्धल सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद..!*
==============
केलेला संकल्प पूर्ण केल्याचे आत्मीक समाधान लाभण्यासारखे सुख दूसरे कोणतेच नाही..! परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांती नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ थायलंड येथील ११० भिक्खूंचा सहभाग असलेली देशातील पहिली धम्म पदयात्रेचे आम्ही आयोजन केले होते. दि.17 जानेवारी 2023 रोजी परभणी येथू अत्यंत उत्साहात आणि धम्ममय वातावरणात निघाली. सलग तीस दिवसाचा व 570 किलोमिटरचा हा प्रवास सुकर आणि सुसह्य निश्चितच नव्हता. अनेक अडचणी आल्या परंतु आपणा सर्वांच्या प्रेमाच्या आणि मंगलकामनांच्या बळावर हे अशक्यप्राय धम्म कार्य मी करू शकलो हे अत्यंत विनम्रतापूर्वक नमूद करू इच्छितो ! धम्म पदयात्रेला माझ्या समाज बांधवांनी जो अभूतपूर्व आणि उदंड प्रतिसाद दिला, तो शब्दात मावणारा नाही. प्रवासातला प्रत्येक दिवस नवा अनुभव आणि नवी ऊर्जा देणारा होता. आम्ही घेतलेली मेहनत आणि केलेले नियोजन फलद्रूप झाल्याची भावना मनात दाटून येत आहे. आपण या निमित्ताने दाखवलेले प्रेम माझ्या पुढिल धम्मकार्यासाठी प्रेरणादायी आहे. धम्म कार्यासाठी मी सदैव तत्पर असेन अशी मी ग्वाही देतो ! धम्म पदयात्रा सुखरूप चैत्यभूमी पर्यंत पोहचवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचे योगदान दिले त्या सर्वांचे मनापासून आभार...धन्यवाद..!!!!
सर्वांना सप्रेम जयभीम..नमो बुद्धाय..!!.........................
*डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे*

दिवस अठ्ठावीसवा...म्हाडा कॉलनी ते रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर....माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे धम्मपदयात्रेचे व था...
14/02/2023

दिवस अठ्ठावीसवा...

म्हाडा कॉलनी ते रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर....

माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर येथे धम्मपदयात्रेचे व थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिख्खू संघाचे बौद्ध उपासक-उपासिकांनी जल्लोषात स्वागत केले.
रमाबाई आंबेडकर नगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिध्दार्थ जी हत्तीअंबीरे व धम्मदूत तथा अभिनेते गगन मलिक यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.

#धम्मपदयात्रा #मुंबई

चैत्यभूमी, दादर मुंबई येथे आयोजित ऐतिहासिक बौद्ध धम्म पदयात्रा समारोप कार्यक्रमास लाखोंच्या संख्येने सहभाग नोंदवा...विनम...
14/02/2023

चैत्यभूमी, दादर मुंबई येथे आयोजित ऐतिहासिक बौद्ध धम्म पदयात्रा समारोप कार्यक्रमास लाखोंच्या संख्येने सहभाग नोंदवा...विनम्र आवाहन..!
===============
आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ थायलंड येथील ११० भिक्खूंचा सहभाग असलेली देशातील पहिली धम्म पदयात्रा दि.17 जानेवारी 2023 रोजी परभणी येथू अत्यंत उत्साहात आणि धम्ममय वातावरणात निघाली. सलग 30 दिवस चालत दि.15 फेब्रुवारी 2023 रोजी ही धम्म पदयात्रा चैत्यभूमी, दादर मुंबई पोहचत असून दुपारी 01:00 वाजता या धम्म पदयात्रेचा भव्य समारोप सोहळा चैत्यभूमी, दादर मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. धम्म पदयात्रा समारोप कार्यक्रम थायलंड येथील आदरणीय भिक्खू संघ व मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणार आहे. अशा या ऐतिहासिक धम्म पदयात्रा समारोप सोहळयास लाखोंच्या संख्येने सहभाग नोंदवा...विनम्र आवाहन..!.........................
आयोजक
मा.डॉ.सिद्धार्थ जी हत्तीअंबीरे

दिवस अठ्ठावीसवा...म्हाडा कॉलनी (मुलुंड टोल नाका जवळ) येथुन शहीद हॉल घाटकोपर कडे धम्म पद यात्रेची सुरुवात....   यावेळी आय...
14/02/2023

दिवस अठ्ठावीसवा...

म्हाडा कॉलनी (मुलुंड टोल नाका जवळ) येथुन शहीद हॉल घाटकोपर कडे धम्म पद यात्रेची सुरुवात....

यावेळी आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु.जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिध्दार्थ जी हत्तीअंबीरे यांच्यासह धम्मदूत तथा अभिनेते गगन मलिक व बौद्ध उपासक- उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले.
#धम्मपदयात्रा #मुंबई #मुलुंड

प्रज्ञासूर्य,बोधीसत्व,विश्वरत्न,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई तथा भीमाबाई रामजी...
14/02/2023

प्रज्ञासूर्य,बोधीसत्व,विश्वरत्न,भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाई तथा भीमाबाई रामजी सकपाळ यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !

14/02/2023

दिवस सत्तावीसवा....
ठाणे शहर....

आज ठाणे शहरात धम्मपद यात्रेचे व थायलंड येथील आंतरराष्ट्रीय भिख्खू संघाचे आगमन होताच बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या जल्लोषात यात्रेचे स्वागत करण्यात आले.
तथागत भगवान गौतम बुद्धांच्या पवित्र अस्थीकलस दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायांनी उपस्थित होते. यावेळी आयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.सिध्दार्थ जी हत्तीअंबीरे यांच्यासह धम्मदूत तथा अभिनेते गगन मलिक यांच्यासह हजारोंच्या संख्येने ठाणे व पंचक्रोशीतील बौद्ध अनुयायी उपस्थित होते.
#धम्मपदयात्रा #ठाणे #मुंबई

Address

Parbhani
431401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhamma Padyatra - धम्म पदयात्रा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share