Shree Saptashrung Niwasini Devi Trust, Saptashrung Gad

Shree Saptashrung Niwasini Devi Trust, Saptashrung Gad Shree Saptashrung Niwasini Devi Trust (SSNDT)
(1)

22/01/2026

प्रेसनोट:
सप्तशृंगगड येथील रहिवासी व ग्रामपंचायत सदस्या सौ बेबीबाई जाधव आणि श्री छगन जाधव यांनी मांडलेल्या विविध मागण्यांबाबत विश्वस्त संस्थेच्या वतीने संदर्भीय विषयांवर त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमणे बाबत मंगळवार, (ता. २०) रोजी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मा श्री अभय लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वस्त मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जाधव यांच्या निवेदनातील मागण्या व तक्रारीची सखोल चौकशी करण्यासाठी विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मा श्री अभय लाहोटी यांनी एक स्वतंत्र त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीमध्ये कळवणचे तालुका न्यायदंडाधिकारी, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, कळवण आणि ज्येष्ठ विधिज्ञ चैतन्य ब्राम्हणकर यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती आपला अंतरिम अहवाल ३० दिवसात सादर करणार असून, त्या अहवालानुसार पुढील नियमांतर्गत कारवाई केली जाणार आहे. ट्रस्टच्या वतीने विश्वस्त तथा कळवणचे तहसीलदार श्री रोहिदास वारुळे व विश्वस्त ॲड. ललित निकम यांनी उपोषणस्थळी जाऊन या निर्णयाचे अधिकृत पत्र उपोषणकर्त्यांना सुपूर्त करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार विश्वस्त मंडळ प्रतिनिधी यांनी उपोषणकर्त्यांशी त्यांच्या विविध मागणी व तक्रारी बाबत सकारात्मक व नियमांतीक निर्णय होवून कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, विश्वस्त संस्थे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांनी उपोषण कर्ते यांना तूर्तास उपोषण मागे घेणे बाबत विनंती करण्यात आलेली आहे.

सर्व भाविकांला अधिकृत माहितीसाठी सविनय सादर....!
12/01/2026

सर्व भाविकांला अधिकृत माहितीसाठी सविनय सादर....!

प्रेसनोट नाताळ उत्सव संदर्भीय सुट्टयांचा कालावधी, शाकंबरी नवरात्रोत्सव, नववर्ष स्वागत निमित्त होत असलेल्या गर्दीच्या अनु...
29/12/2025

प्रेसनोट

नाताळ उत्सव संदर्भीय सुट्टयांचा कालावधी, शाकंबरी नवरात्रोत्सव, नववर्ष स्वागत निमित्त होत असलेल्या गर्दीच्या अनुषंगाने गर्दीचे व्यवस्थापन व भाविक - भक्ताना समाधानकारक दर्शन होणे दृष्टीने श्री भगवती मंदिर भाविकांना २४ तास खुले असणार...!

प्रतिनिधी:

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील श्री भगवती – श्री सप्तशृंगी माता मंदिर येथे सालाबादप्रमाणे नाताळ उत्सव संदर्भीय सुट्टयांचा कालावधी, शाकंबरी नवरात्रोत्सव, नववर्ष स्वागत निमित्त होत असलेल्या गर्दीच्या अनुषंगाने गर्दीचे व्यवस्थापन व भाविक - भक्ताना समाधानकारक दर्शन होणे दृष्टीने श्री भगवती मंदिर हे भाविकाना दर्शनासाठी मंगळवार, दि. ३०/१२/२०२५ पासून रविवार, दि. ०४/०१/२०२६ रोजी पावेतो २४ तास खुले असणार आहे.

सालाबादप्रमाणे नाताळ उत्सव संदर्भीय सुट्टयांचा कालावधी, शाकंबरी नवरात्रोत्सव, नववर्ष स्वागत निमित्त अनेक भाविक श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे श्री भगवतीच्या दर्शनाने करतात. त्यामुळे श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नववर्षाच्या दरम्यान भाविक - भक्तांची प्रचंड गर्दी लोटते. पर्यायी होणाऱ्या संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने गर्दीचे व्यवस्थापन व भाविक भक्ताना समाधानकारक दर्शन होणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांची गर्दी विभागली जावी आणि सर्वांना सहजतेने श्री भगवती दर्शन घेता यावे यासाठी नुतन वर्ष प्रारंभास विविध राज्यातून येणाऱ्या भाविक - भक्तांसाठी श्री भगवती मंदिर हे भाविकाना दर्शनासाठी मंगळवार, दि. ३०/१२/२०२५ पासून रविवार, दि. ०४/०१/२०२६ रोजी पावेतो २४ तास खुले असणार आहे. खुले ठेवण्यात येणार असून भाविक - भक्तांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने वृत्त टिपणीद्वारे करण्यात आले आहे.

*प्रेसनोट*दिवाळी उत्सव कालावधीत आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे श्री सप्तशृंगी मातेची दर्शन व्यवस्था ह...
19/10/2025

*प्रेसनोट*

दिवाळी उत्सव कालावधीत आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथे श्री सप्तशृंगी मातेची दर्शन व्यवस्था ही भाविकांना दैनंदिन स्वरूपात मध्यरात्री १२.०० वाजे पावेतो सुरू राहणार

आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे दिवाळी उत्सव दरम्यान सालाबादप्रमाणे होणारी भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने श्री भगवती - श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे बुधवार, दि. २२/१०/२०२५ पासून गुरुवार, दि. ०६/११/२०२५ पावेतो दर्शनासाठी दैनंदिन स्वरूपात रात्री १२.०० वाजे पावेतो खुले ठेवून भाविकांना श्री भगवती - श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिवाळी उत्सव कालावधी दरम्यान राज्यातील तसेच परराज्यातील विविध शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी असते, तसेच दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या व नवरात्र उत्सवातील गर्दीच्या परिस्थितीमुळे श्री भगवती दर्शनासाठी येवू न शकलेला भाविक वर्ग यांची मोठी संख्या विचारात घेता अचानक होणाऱ्या संभाव्य गर्दीची परिस्थिती टाळणे हेतूने श्री भगवती मंदिर हे दैनंदिन स्वरूपात *पहाटे ५.०० ते रात्री १२.०० वाजे दरम्यान* भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवल्यास भाविकांच्या गर्दीची योग्य ती विभागणी तसेच भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर पडणार ताण विभागून भाविकांना श्री भगवती दर्शनासह इतर सुविधांचा विशेष लाभ घेता येईल. या दृष्टीने विश्वत संस्थेने सदरचे नियोजन केले आहे. दरम्यान आवश्यतेनुसार श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदीसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच फ्युनीकुलर रोप वे ट्रॉली सुविधा देखील दैनंदिन स्वरूपात पहाटे ५.०० ते रात्री ११.३० वाजे पावेतो भाविकांना उपलब्ध असेल असे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यानच्या कालावधीत भाविकांना दैनंदिन पहाटे ५.०० वाजे पासून रात्री १२.०० वाजे पावेतो श्री भगवती दर्शन व्यवस्था सुरू असेल, याची नोंद घेवून गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन सुविधेच्या उपलब्ध वेळेचा विचार करता आपल्या निर्धारित वेळेत श्री दर्शनासाठी येवून मंदिर व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य देवू करावे. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
fans

ll सस्नेह निमंत्रण ll"अश्विन नवरात्र यात्रा व कोजागिरी उत्सव - २०२५"                   fans
08/09/2025

ll सस्नेह निमंत्रण ll

"अश्विन नवरात्र यात्रा व कोजागिरी उत्सव - २०२५"
fans

दि. १६/०७/२०२५ रोजीचा दैनिक आपलं महानगर, नाशिक आवृत्ती मध्ये प्रसिद्ध  नेमणूक जाहिरात
16/07/2025

दि. १६/०७/२०२५ रोजीचा दैनिक आपलं महानगर, नाशिक आवृत्ती मध्ये प्रसिद्ध नेमणूक जाहिरात

दि. १५/०७/२०२५ रोजीचा दैनिक भ्रमर मध्ये प्रसिद्ध  ई-निविदा जाहिरात
16/07/2025

दि. १५/०७/२०२५ रोजीचा दैनिक भ्रमर मध्ये प्रसिद्ध ई-निविदा जाहिरात

20/05/2025

आद्यस्वयंभू शक्तीपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगड येथील "आद्यस्वयंभू श्री सप्तशृंगी माता" या आधुनिक तंत्रज्ञान व कथानक यावर आधारित VR-360° पद्धतीने साकारलेल्या विशेष चलचित्रफित एक अद्वितीय अनुभव साक्षात दर्शनाचा...!


Shree Saptashrung Niwasini Devi Trust, Saptashrung Gad Sudarshan Dahatonde Sudarshan A Dahatonde Alias Swachhandi Swachhandi Pariwar Swachhandi Youth Foundation (S*F)

*भाविकांना नम्र आवाहन*आद्य स्वयंभू श्री सप्तशृंगी माता: आधुनिक व्ही आर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र येथील विहं...
13/05/2025

*भाविकांना नम्र आवाहन*

आद्य स्वयंभू श्री सप्तशृंगी माता: आधुनिक व्ही आर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र येथील विहंगम दृश्य, पौराणिक संदर्भीय माहिती व कथा अनुभव तसेच श्री दर्शनाची डिजिटल सुविधा आदींची संधी भाविकांना उपलब्ध झाली असून "अद्वितीय अनुभव साक्षात दर्शनाचा" या सुविधेचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

वृत्त संदर्भ:
https://www.loksatta.com/nashik/tour-of-saptashrungi-fort-through-vr-360-technology-soon-asj-82-4972532/

पंडितप्रवर प. पू. श्री. गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजी यांना साहित्य एवं शिक्षा संदर्भीय कार्यासाठी भारताचा नामांकित पदम ...
29/04/2025

पंडितप्रवर प. पू. श्री. गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजी यांना साहित्य एवं शिक्षा संदर्भीय कार्यासाठी भारताचा नामांकित पदम पुरस्कार पैकी "पद्मश्री" हा सन्मान अर्थात पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल प. पू. गुरुजींचे मनःपूर्वक अभिनंदन...!

शुभेच्छा द्वारा:
मा. अध्यक्ष, विश्वस्त व प्रशासकीय अधिकारी वर्ग / व्यवस्थापन तसेच कर्मचारी व पुरोहित वर्ग,
श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंग (नाशिक, महाराष्ट्र)

Address

Shree Saptashrung Niwasini Devi Trust
Nashik
423501

Opening Hours

Monday 5am - 9pm
Tuesday 5am - 9pm
Wednesday 5am - 9pm
Thursday 5am - 9pm
Friday 5am - 9pm
Saturday 5am - 9pm
Sunday 5am - 9pm

Telephone

+912592223351

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Saptashrung Niwasini Devi Trust, Saptashrung Gad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree Saptashrung Niwasini Devi Trust, Saptashrung Gad:

Share