स्वयंभू श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थान धापेवाडा विदर्भाचे पंढरपुर, नागपुर

  • Home
  • India
  • Nagpur
  • स्वयंभू श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थान धापेवाडा विदर्भाचे पंढरपुर, नागपुर

स्वयंभू श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थान धापेवाडा विदर्भाचे पंढरपुर, नागपुर Dhapewada village is situated on the banks of the Chandrabhaga river. A noteworthy feature of the to

❗७ जुलै❗‼जय हरि विठ्ठल‼                           🌹प्रवचनाचा विषय🌹       🟦🟥🟦मूल होऊन भगवंतापाशी जावे.🟦🟥🟦🏵या जगात कर्माशि...
07/07/2023

❗७ जुलै❗
‼जय हरि विठ्ठल‼

🌹प्रवचनाचा विषय🌹
🟦🟥🟦मूल होऊन भगवंतापाशी जावे.🟦🟥🟦

🏵या जगात कर्माशिवाय कोण राहतो ❓ पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण, आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवीत नाही.🏵

🛟'मी कोण' हे जाणायला ज्ञान आणि भक्ति लागतेच. तसेच, 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी.🛟

💠लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते, त्याप्रमाणे समर्थांसारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे. डोळे मिटून जितके काम होईल, अंधश्रद्धेने जे होईल, ते अभिमानाने, ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार.💠

💮मूल होऊन भगवंताला ओळखावे. याला अडचण एकच असते; माझे 'शहाणपण' आड येते. भक्त मुलांसारखे वागतात देव त्यांचे लाड पुरवितो. कुणी असे म्हणतील की, "भगवंताची आणि आमची ओळख नाही, तर त्याची आम्ही कशी पूजा करावी❓" "त्याला ओळखल्या शिवाय मी भजन करणार नाही" असे म्हणणे वेडेपणाचेच आहे.💮

🔸️भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहे.🔸️

💢संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला; तो असा की, देहाने प्रपंच करा, पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही.💢

🔹ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे.🔹

❄प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. 'देव माझा आहे' असे म्हणण्या‍ऐवजी 'मी देवाचा आहे' असे म्हणावे, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे.❄

⭕साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे; म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. प्रपंचात कधीच धीर सोडू नये.⭕

♦️ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्यामागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली, की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात.♦️

🛞या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय.🛞

🌲 #बोधवचन :भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळविले की भक्ति येते.🌲

🚩 #प्रवचने :श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज🚩

🌷श्री राम जय राम जय जय राम🌷

जयहरि विठ्ठल 🌹पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।रत्नकीळ फांकती प्रभा ।अगणित लावण्य तेज पुंजाळलें ।न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥...
04/07/2023

जयहरि विठ्ठल 🌹
पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेज पुंजाळलें ।
न वर्णवे तेथींची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
त्यानें मज लाविलें वेधी ।
खोळ बुंथी घेऊनी खुणेची पालवी ।
आळविल्या साधुनेदी ॥२॥
शब्देंवीण संवादु दुजेवीण अनुवादु हें तव कैसेनि गमे ।
परेहि परते बोलणे खुंटले ।
वैखरी कैसेनि सांगे ॥३॥
पायां पडू गेलों तंव पाउलचि न दिसे ।
उभाची स्वयंभु असे ।
समोर कीं पाठीमोरा न कळे ।
ठकचि पडिले कैसें ॥४॥
क्षेमालागीं जीव उतावीळ माझा ।
म्हणवुनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेलें तव मीची मी एकली ।
आसवला जीव राहो ॥५॥
बापरखुमादेविवरु ह्रदयींचा जाणुनी अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळा पाहूं गेलें ।
तंव भीतरी पालटु झाला ॥६॥
जय जय रामकृष्ण हरि 🌹🙏

आज शुक्रवार दि.१५, जुलै,२०२२, आषाढ कृ.२,शके १९४४, दररोज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंगाचे  नित्यव...
15/07/2022

आज शुक्रवार दि.१५, जुलै,२०२२, आषाढ कृ.२,शके १९४४, दररोज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अभंगाचे नित्यवाचन
॥ १९३०॥
अभंग १४७१
ऐका हें वचन माझें संतजन ।
विनवितों जोडुन कर तुम्हां ॥१॥
तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥
आमुच्या जीवींचा तोचि जाणे भावो । रखुमाईचा नाहो पांडुरंग ॥२॥
चित्त माझें त्याचे गुंतलेंसे पायीं ।
म्हणऊनि कांहीं नावडे त्या ॥३॥
तुका म्हणे मज न साहे मीनती ।
खेद होय चित्तीं भंग मना ॥४॥
भावार्थ
हे संत जन हो माझे बोलणे तुम्ही कृपया करून ऐका हे मी तुम्हाला हात जोडून मी विनवीत आहे. काही लोक आपल्याला जे वाटेल ते तर्ककुतर्क करतात, ते काहीही बडबडतात त्यांना कोणी थांबवावे? आमच्या जिवाच्या अंतर्भाव तो रुक्मिणीचा पती पांडुरंग जाणतो आहे. माझे चित्त पांडुरंगाच्या पायी गुंतलेले आहे त्यामुळेच मला त्याच्यावाचून दुसरे काहीच आवडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात काही भाविक माझ्या मताला मिळतात तर काही तर्किक माझे मत मानत नाही त्यामुळे माझ्या चित्ताला खेद होतो व त्यामुळे माझा मनोभंग होत आहे.
🌺॥ जय जय राम कृष्ण हरि ॥🌺

*🙏गुरु म्हणजे🙏*ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य,गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,गु...
13/07/2022

*🙏गुरु म्हणजे🙏*
ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य,गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य,गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक,
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना
आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी
माझे वदंन...!!
*गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...!*

सुंदर ते ध्यान उभे विटेवरीकर कटावरी ठेवोनिया...!!तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने....!!सर्वांना आषाढी ...
10/07/2022

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया...!!
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने....!!

सर्वांना आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा....

ॐ नमःशिवाय: उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला ।वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ॥ १ ॥वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत ।सुरवरां...
20/07/2021

ॐ नमःशिवाय:

उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला ।
वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ॥ १ ॥

वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत ।
सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ॥ २ ॥

शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी ।
कवाडा आडूनि पाहताती जगजेठी ॥ ३ ॥

सुरवरांची विमाने गगनीं दाटली सकळ ।
रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ ॥ ४ ॥

रंभादिक नाचती उभ्या जोडूनि हात ।
त्रिशूळ डमरू घेऊनि आला गिरजेचा कांत ॥ ५ ॥

पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती ।
भावें ओवाळिती राही रखुमाईचा पती ॥ ६ ॥

अनंत अवतार घेसी भक्तांकारणें ।
कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणें ॥ ७ ॥

चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनीं ।
पाठीमागे डोळे झांकुनि उभी ती जनी ॥ ८

आषाढ वारी

वारकरी पंढरपूर विठ्ठल

आम्ही पंढरीचे वारकरी

भेटण्या विठूरायाच्या पंढरपूरी

श्री ज्ञानदेवाची पालखी निघेे भोयांचा खांद्यावरी

डोळे भरूनी पाहण्या विठूराया वारी निघे पंढरपूरी

वारकरी नाचे अभंगाच्या तालावरी

घेऊनिया भगवा झेंडा खांद्यावरी

वारी चाले टाळ, मृदुंगाच्या तालावरी

तुकोबांचे अभंग वारकऱ्याच्या जीभेवरी

वारकरी चैतन्य साऱ्या सृष्टीवरी

वारी चाले जरी दूरवरी

विठू राहे वारकऱ्याचा हदयावरी

विठू राहे त्याच्या अंतःकरणावरी

ज्ञानियांची पालखी निघे पंढरी

भेटण्या विठू राहे माझा पंढरी

वारकरी जाये वळणा वळणावरी

दिसे तया विठूराया उभा हात कटेवरी

चैतन्य वाहे गावा गावावरी

सडे रांगोळया रस्ते रस्त्यावरी

पालखीच्या आगमनानी सजली फुल वेलीवरी

फुलवेलींनी निसर्ग सडा रस्त्यावरी

वर्षाधारा बरसे आनंद गगनावरी

स्वागता ज्ञानीयांच्या आल्या पावसाच्या सरी

आल्या सरी वर सरी

वारकरी नाचे आपल्याच तालावरी

नाही तमा तया नाद विठूरायांवरी

पंढरी सोडून विठू संगे वारकरी

विठूराया नाचे घेऊनी हात कटेवरी

माऊली माऊली नाद आसमंतावरी

पाहू संताचे तेज तयांच्या मुखावरी

मोक्षानंद प्राप्ती तेज लहरी

चैतन्यवाहे संत मुखावरी

धन्य धन्य पाहू वारी

रिंगण सोहळा नाचे वारकरी

माऊली बसे अश्वावरी

माऊली माऊली गर्जना जाई नभावरी

चैतन्याचा सोहळा पंढरपूरी

जन्मा येऊनी करावी पायी वारी

जावे भेटण्या विठूरायांच्या पंढरपूरी

आत्मानंद घ्यावा व्हावे एकदा वारकरी

परमोच्च आनंद प्राप्ती विठूरायांच्या पंढरपूरी

आम्ही काव्यरसिक

पंढरीचे वारकरी

जयजय रामकृष्ण हरी माऊली

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पुरुषोत्तम मास (अधिक मास) कमला एकादशी निमित्त श्री. विठ्ठल व रूक्म...
27/09/2020

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पुरुषोत्तम मास (अधिक मास) कमला एकादशी निमित्त श्री. विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यास व मंदिरात रंगीबेरंगी फुलाची सुंदर मनमोहक अशी आरास करण्यात आली आहे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

गुरु तीर्थाचेही  तीर्थ थोर l  गुरु सत्वगुण मेरू डोंगर  l                 गुरु आनंद सुख माहेर l  साधकासी  ll1ll          ...
05/09/2020

गुरु तीर्थाचेही तीर्थ थोर l गुरु सत्वगुण मेरू डोंगर l गुरु आनंद सुख माहेर l साधकासी ll1ll

गुरु स्वर्गीचा ब्रह्मदूत l गुरु साधकाचे करी हित l गुरु युगायुगाचा पुण्यवन्त l अवतारे जगी ll2ll

गुरु ब्रम्हज्ञान विद्यापीठ l गुरु आत्मस्वरूप दावी स्पष्ट l गुरुकृपे मोक्ष लयलूट l साधक करिती ll3ll

*॥ संत नामदेव समाधी साेहळा ॥*अमृताहुनी गोड नाम तुझे देवा । मन माझे केशवा का बा न घे ॥१॥सांग पंढरीराया काय करु यांसी । का...
18/07/2020

*॥ संत नामदेव समाधी साेहळा ॥*

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा । मन माझे केशवा का बा न घे ॥१॥

सांग पंढरीराया काय करु यांसी । का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥

किर्तनी बैसता निद्रे नागविले । मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥

हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती । न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥

- संत नामदेव

कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज ।।१।।आड कांहीं नये दुजें । फऴ बीजें आणिलें ।।२।।उद्वेग तो वांयांविण । कैंचा शीण चिं...
17/07/2020

कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज ।।१।।

आड कांहीं नये दुजें । फऴ बीजें आणिलें ।।२।।

उद्वेग तो वांयांविण । कैंचा शीण चिंतनें ।।३।।

तुका म्हणे गेला भ्रम । तुमच्या धर्म पायाचा ।।४।।

अर्थ:- हे श्रीविठ्ठला, तुझे नित्य चिंतन करीत असताना माझा प्रारब्धकर्माचा भोग कोठे उरला आहे ? कारण, नित्य चिंतनामुऴे प्रारब्ध कर्माला भोग देण्यास अवकाशच मिऴत नाही.।।१।।

आता तुझ्यात आणि माझ्यात ऐक्य होण्यासाठी कोणताही प्रतिबंध राहिला नाही. चिंतनरुपी बीजाने मला हे फऴ प्राप्त करून दिले आहे.।।२।।

तुझ्या चिंतनापुढे संसाराच्या चिंतेचे दुःख कसे राहील ?।।३।।

पादपद्मी श्रीतुकाराममहाराज* म्हणतात, हे श्रीविठोबा, तुझ्या पायाच्या प्रसादाने भेदभ्रम निवृत्त झाला आहे.।।४।।

आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥भय ना...
09/07/2020

आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥

जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥

भय नाहीं चिंता कोणता प्रकार । झालोंसे निर्भय नामबळें ॥३॥

चोखा म्हणे आतां लागलासे झरा । विठोबा दातारा याचि नामें ॥४॥

Address

नागपुर ते कळमेश्वर ते सावनेर मार्ग, नागपुर
Nagpur
441501

Telephone

9766004474

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वयंभू श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थान धापेवाडा विदर्भाचे पंढरपुर, नागपुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share