Shri Kevdadevi Mandir - Dahanu Agar

Shri Kevdadevi Mandir - Dahanu Agar Shri Kevdadevi Mandir - Dahanu Agar सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधके |
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||

🙏🙏🙏आजपासुन सुरू होणा-या शारदिय नवरात्रोत्सवाच्याआपणास व आपल्या परिवारास  हार्दिक शुभेच्छा ! आई केवडा देवीच्या कृपेने आपण...
29/09/2019

🙏🙏🙏आजपासुन सुरू होणा-या
शारदिय नवरात्रोत्सवाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
आई केवडा देवीच्या कृपेने
आपणास उत्त्तम आरोग्य,
सुख,
शांती,
समाधान लाभो...💐💐💐
हिच मनापासुन प्रार्थना !!
🙏🙏🙏🙏🙏

दुर्गा महोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा.. आई केवडावंती आपणा सर्वांना सुख समृद्धी व यश प्राप...
01/10/2016

दुर्गा महोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा.. आई केवडावंती आपणा सर्वांना सुख समृद्धी व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी ॥ तीच्या चरणी प्रार्थना.. ।|

श्री. वैभव प्रफुल्ल पंडित
M.Com., M. Lib.& I Sc., M. Phil., G.D.C. & A.

14/10/2015

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

नवरात्राची आरती

आश्विनशुध्दपक्षी अंबा बैसली सिंहासनी हो | प्रतिपदेपासून घटस्थापना ती करुनी हो | मूलमंत्रजप करुनी भोवते रक्षक ठेवुनी हो | ब्रम्हा विष्णू आईचे पूजन करिती हो || १ || उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो | उदोकारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो || धृ || द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो | सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो | कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो | उदोकारे गर्जती सकळ चामुंडा मिळूनी हो | उदो || तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडीला हो | मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ताफळा हो | कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो | अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो | उदो || ३ || चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो | उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत:करणी हो | पूर्ण कृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो | भक्तांच्या माउली सुर तें येती लोटांगणी हो | उदो || ४ || पंचमीचे दिवशी व्रत तें उपांगललिता हो | अर्ध्यपाद्यपूजने तुजला भवानी स्तविती हो | रात्रीचे समयी करिती जागरण हरिकथा हो | आनंदे प्रेम तें आले सदभावे क्रीडता हो | उदो || ५ || षष्ठीचे दिवशी भक्तां आनंद वर्तला हो | घेउनी दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो | कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा हो | जोगवा मांगता प्रसन्न झाली भक्तकुळा हो | उदो || ६ || सप्तमीचे दिवशी सप्तशृंगगडावरी हो | तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नानापरी हो | जाईजुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो | भक्त संकटी पडतां झेलुनी घेसी वरचेवरी हो | उदो || ७ || अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो | सह्याद्रीपर्वती राहिली उभी जगज्जननी हो | मन माझे मोहिले शरण आलो तुजलागुनी हो | स्तनपान देऊनी सुखी केलें अंत:करणी हो | उदो || ८ || नवमीचे दिवशी नवदिवसाचे पारणे हो | सप्तशतीजप होमहवने सदभक्तीकरुनी हो | षड्रस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो | आचार्य ब्राम्हणा तृप्त केलें कृपेकरुनी हो | उदो || ९ || दशमीच्या दिवशी अंबा निघे सीमोल्लघनी हो | सिंहारूढ करी दारूण शस्त्रे अंबे त्वां घेउनी हो | शुंभनिशुभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो | विप्रा रामदासा आश्रम दिधला तो चरणी हो | उदो बोला उदो अंबाबाई माउलीचा हो || १० ||

आजचा रंग निळा दुर्गा महोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा.. आई केवडावंती आपणा सर्वांना सुख समृद...
14/10/2015

आजचा रंग निळा

दुर्गा महोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा.. आई केवडावंती आपणा सर्वांना सुख समृद्धी व यश प्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी ॥ तीच्या चरणी प्रार्थना.. ।|

श्री. वैभव प्रफुल्ल पंडित
M.Com., M. Lib.& I Sc., M. Phil., G.D.C. & A.

कालचा रंग लाल दि। 13.10.2015..
14/10/2015

कालचा रंग लाल दि। 13.10.2015..

आजचा रंग पिवळा दि. २५.०९.२०१४आज पासून सुरु होणार्यादुर्गामहोत्सवाच्या तुम्हाला वतुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा......
25/09/2014

आजचा रंग पिवळा दि. २५.०९.२०१४

आज पासून सुरु होणार्या
दुर्गामहोत्सवाच्या तुम्हाला व
तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....
आई केवडावंती आपणा सर्वांना सुख, शांती, समृद्धी, ऎश्वर्य व
यश प्रदान करो, अशी तीच्या चरणी प्रार्थना....

श्री. धनंजय प्रफुल्ल पंडित.

25/09/2014

नवार्ण मंत्र....!!!

नवरात्र हे 'शक्ती' उपासनेचे पर्व आहे. नवरात्रौत्सवात ब्रह्मांडातील सर्व ग्रह एकत्र येऊन सक्रिय होतात व त्याचा विपरित परिणाम मुक प्राण्यांवर होतो. ग्रहांच्या दुष्परिणामांपासून त्यांचे रक्षण करण्यासाठी नवरात्रौत्सवात आदी शक्तीची पूजा केली जाते. आदीशक्ती दु:खांचा नाश करणारी माता आहे. त्यामुळे नवरात्रात आदीशक्तीची पूजा मनोभावे केली जाते. देवीच्या नऊ शक्ती जागृत हो़ऊन नवग्रहांना आमंत्रित करतात. त्यामुळे मुक्या प्राण्यांवर ग्रह दया करून त्यांना सोडून देतात.....

देवीच्या या नऊ शक्ती जागृत करण्यासाठी 'नवार्ण' मंत्राचा जप करावा लागतो. नव म्हणजे नऊ व अर्ण म्हणजे अक्षर. नवार्ण मंत्र अर्थातच नऊ अक्षरी आहे. नवार्ण मंत्र पुढील प्रमाणे-'ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे' या मंत्रातील एक-एक अक्षराचा संबंध आदीमातेच्या एक-एक शक्तिशी आहे. त्याचप्रमाणे एक-एक शक्तिचा संबंध एक-एक ग्रहाशी आहे......

नवार्ण मंत्रातील नऊ अक्षरामधील पहिले अक्षर 'ऐ' आहे. तो सूर्य या ग्रहाला आमंत्रित करतो. तसेच 'ऐं' या अक्षराचा संबंध दुर्गादेवीची पहिली शक्ति 'शैल पुत्री'शी आहे. त्यामुळे तिची उपासना नवरात्रीच्या पहिल्या माळेला म्हणजे प्रथम दिवशी केली जाते. दूसरे अक्षर 'ह्रीं' आहे. तो चंद्र या ग्रहाला आमंत्रित करतो. तसेच त्याचा संबंध दुसरी शक्ति 'ब्रह्मचारिणी'शी आहे. तिची पूजा दुसर्‍या दिवशी केली जाते.

त्याप्रमाणे तिसरे अक्षर 'क्लीं' आहे, चौथे 'चा', पाचवे 'मुं', सहावा 'डा', सातवा 'यै', आठवा 'वि' तसेच नववा 'चै' आहे. ते क्रमशः मंगळ, बुध, बृहस्पति, शुक्र, शनि, राहु व केतु या ग्रहाना नियंत्रित करतात.

दुर्गामातेच्या चंद्रघंटा, कृष्माण्डा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्रि, महागौरी व सिद्धिदात्री या शक्ति आहेत. त्याची आराधना नवरात्रीमध्ये तिसर्‍या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या व नवव्या दिवशी केली जाते. या 'नवार्ण' मंत्राचे ब्रह्मा, विष्णु व महेश हे तीन देव तर महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती ह्या त्यांच्या तीन देव्या आहेत. आदीशक्ती दुर्गामातेच्या या नऊ शक्ति धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थाची प्राप्‍ती करण्यातही सहाय्यक ठरतात.

'नवार्ण' मंत्राचे 108 वेळा जप दिवसातून किमान तीन वेळा केला पाहिजे. विजयादशमीच्या दिवशी या नऊ अक्षरी नवार्ण मंत्राच्या आधी ॐ हे अक्षर जोडून या दशाक्षरी मंत्र दुर्गा सप्तशतीमध्ये देण्यात आला आहे. मात्र, या मंत्रात ॐ हे अक्षर जोडल्याने मंत्राच्या प्रभावावर कुठलाही परिणाम होत नाही.....!!!!

माहीती संग्रहक :
श्री. वैभव प्रफुल्ल पंडित
M.Com., M. Lib.& I Sc., M. Phil., G.D.C. & A.

25/09/2014

आज पासून सुरु होणार्या
दुर्गामहोत्सवाच्या तुम्हाला व
तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....
आई केवडावंती आपणा सर्वांना सुख, शांती, समृद्धी, ऎश्वर्य व
यश प्रदान करो, अशी तीच्या चरणी प्रार्थना....

श्री. धनंजय प्रफुल्ल पंडित.

Todays Colour is RED
08/10/2013

Todays Colour is RED

Today Colour is RED
08/10/2013

Today Colour is RED

09/08/2013

नागपंचमी :

श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा करतात, म्हणून या दिवसास ‘नागपंचमी’ म्हणतात. भारतातील हा एक महत्त्वाचा सण आहे. कृष्णाने कालिया नावाच्या नागाचे दमन केले व या दिवशी तो डोहातून विजयी होऊन वर आला. तेव्हा लोकांनी कृष्णाची व नागाची पूजा केली, अशी कथाही सांगितली जाते. नाग हे द्रविड लोकांचे दैवत होते; पण आर्य व द्रविड यांच्या मिश्रणानंतर नागपूजा सर्वत्र सुरू झाला, असे म्हणतात. मनुष्याला त्रास देणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग हा एक भयंकर प्राणी आहे. म्हणून वर्षातून एक दिवस त्याची पूजा केली, तर त्यापासून भय राहणार नाही, या कल्पनेने श्रावण शुद्ध पंचमीच्या दिवशी नागाची पूजा प्रचलित झाली असावी.

हा सण मुख्यतः स्त्रियांचा समजला जातो. या दिवशी प्रत्यक्ष नागाची पूजा करतात किंवा नागाची मातीची प्रतिमा करून अथवा रक्तचंदनाने वा हळदीने पाटावर नवनागांच्या आकृती काढून त्यांची पूजा करतात. गारुडी लोक खरे नाग घेऊन घरोघरी हिंडतात. लोक नागाला दूध, लाह्या इ. पदार्थ वाहून त्याची पूजा करतात. स्त्रिया व मुली या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर जाऊन वारुळाची वा मंदिरात जाऊन नागाची पूजा करतात. जमीन खणणे, नांगरणे, भाज्या चिरणे वगैरे गोष्टी या दिवशी वर्ज्य मानलेल्या आहेत. गाणी गाणे, फेर धरणे, झोपाळे बांधून झोके घेणे, विविध खेळ खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात.

भारतात सर्व प्रांतांत हा सण साजरा करतात. काशीमध्ये ‘नागकूप’ नावाचे तीर्थ आहे. विद्वान पंडित या दिवशी शास्त्रचर्चा करतात आणि नागकूपावर जाऊन नागाची पूजा करतात. प्रसिद्ध वैयाकरण पतंजली हा शेषाचा अवतार असून त्याचे वास्तव्य नागकूपात आहे, अशी समजूत त्यामागे आहे. बंगालमध्ये सर्पदेवता मनसादेवीची, तर राजस्थानमध्ये पीपा, तेजा इ. नागदेवांची पूजा करतात. प्रांतपरत्वे या दिवशीच्या नागपूजनात थोडाफार फरक आढळतो.

‘नागपंचमी व्रत’ नावाचे स्त्रियांनी आचरावयाचे एक व्रतही आहे. त्यात अनंत, वासुकी इ. अष्टनागांची पूजा करून उपवास करतात. संध्याकाळी नागाची पूजा करून उपवास सोडतात. उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणास गाय व सोन्याचा नाग दक्षिणा म्हणून देतात. या व्रताच्या अनेक कथा प्रचलित आहेत. इतर सणांप्रमाणेच या सणाशी निगडीत अशी सुंदर लोकगीते व इतर लोकसाहित्या मराठीत आढळते.

नागपंचमी सण श्रावण शुद्ध पंचमीला साजरा केला जातो.

श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण नागपंचमी हा आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. हा सण फार जुन्या काळापासून पाळला जात असावा.

कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात. या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, कुटायचे नाही. असे काही नियम पाळतात. भाविक श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.

माहीती संग्रहक :
श्री. वैभव प्रफुल्ल पंडित
M.Com., M. Lib.& I Sc., M. Phil., G.D.C. & A.

09/08/2013

श्रावणी सोमवारचे व्रत

श्रावणी सोमवारच्या व्रतात भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते. हे सोमवारचे व्रत तीन प्रकारचे असते. सोमवार, सोळा सोमवार आणि सौम्य प्रदोष. सोमवार व्रताचा विधी सर्व व्रतांत सारखाच असतो. हे व्रत श्रावण महिन्यात सुरू करणे शुभ मानले जाते.

श्रावणी सोमवारचे व्रत सूर्यादयापासून प्रारंभ करून तिसर्‍या प्रहरापर्यंत केले जाते. शंकराच्या पूजेनंतर सोमवार व्रताची कथा ऐकणे गरजेचे आहे. हे व्रत करणार्‍याने दिवसातून एकदाच जेवायला हवे.

असे करावे व्रत

श्रावणी सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठावे.
पूर्ण घराची स्वच्छता करावी व स्नान करावे.
गंगा जल वा पवित्र पाणी घरात शिंपडावे.
घरातच किंवा पवित्र ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती वा चित्र ठेवावे.

पूजेची तयारी झाल्यानंतर खालील मंत्राने संकल्प करा.

'मम क्षेमस्थैर्यविजयारोग्यैश्वर्याभिवृद्धयर्थं सोमव्रतं करिष्ये'

त्यानंतर खालील मंत्राने ध्यान करा.-
'ध्यायेन्नित्यंमहेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌।
पद्मासीनं समंतात्स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववंद्यं निखिलभयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌॥

ध्यानानंतर 'ऊँ नमः शिवाय' हा मंत्र म्हणून शिव व पार्वतीची षोडषोपचारे पूजा करा.
पूजेनंतर व्रताची कहाणी ऐका.
त्यानंतर आरती करून प्रसाद वाटा.
मग भोजन वा फलाहार घ्या.

श्रावणी सोमवार व्रताचे फळ
सोमवारचे हे व्रत नियमितपणे केल्यास भगवान शिव व पार्वतीची कृपा आपल्यावर होते.
जीवनात संपन्नतेचा अनुभव येतो.
सर्व संकटांना भगवान शिव दूर करतात.

संग्रहक
श्री. वैभव प्रफुल्ल पंडित
M.Com., M. Lib.& I Sc., M. Phil., G.D.C. & A.

Address

Dahanu/Agar, Durga Aali, At. Agar, Tal. Dahanu, Agar-Bordi Road
Mumbai
401602

Telephone

9867655873

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Kevdadevi Mandir - Dahanu Agar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Kevdadevi Mandir - Dahanu Agar:

Share