इच्छापुर्ती गणेश, बोलेवाडी, दादर

  • Home
  • India
  • Mumbai
  • इच्छापुर्ती गणेश, बोलेवाडी, दादर

इच्छापुर्ती गणेश, बोलेवाडी, दादर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from इच्छापुर्ती गणेश, बोलेवाडी, दादर, s.k.bole road, Mumbai.

युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या ३५०व्या राज्याभिषेकास या वर्षी प्रारंभ झाला आहे.या निमित्ताने बालमित्र मंडळ सार्वजनिक ग...
27/09/2023

युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांच्या ३५०व्या राज्याभिषेकास या वर्षी प्रारंभ झाला आहे.
या निमित्ताने बालमित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव (इच्छापुर्ती गणेश, दादर) च्या वतीने छत्रपती शिवरायांची लंडन, फ्रान्स, नेदरलँड, जर्मनी येथे असणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रतिकृतीचे तसेच अस्सल शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.
या प्रदर्शनास कारी (जिल्हा - पुणे) येथील छत्रपती शिवरायांचे विश्वासू श्रीमान कान्होजी जेधे यांचे विद्यमान वंशज श्री. इंद्रजित जेधे, शिवराज अष्टकातील सुभेदार तसेच पावनखिंड चित्रपटात ऐतिहासिक भूमिका साकारणारे श्री. अनिकेत बांदल, शिवकालीन सणस घराण्यातील श्री. बाळासाहेब सणस, श्रीनिवास इंदलकर, गोरख करंजावणे देशमुख यांनी आपल्या मंडळास भेट देऊन मंडळाच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

बालमित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, बोलेवाडी, दादर (इच्छापुर्ती गणेश) या मंडळातर्फे गणेशोत्सवाचे संपूर्ण दहा दिवस मंडळाच्...
25/09/2023

बालमित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, बोलेवाडी, दादर (इच्छापुर्ती गणेश) या मंडळातर्फे गणेशोत्सवाचे संपूर्ण दहा दिवस मंडळाच्या परिसरात ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन गणेशभक्तांसाठी व शिवभक्तांसाठी मांडले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज दिनांक २४ सप्टेंबर, २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर व्याख्यानाचे आयोजन केले. अनेक भाविकांनी या व्याख्यानास प्रचंड प्रतिसाद दिला. शिवचरित्र अभ्यासक श्री गणेश शिवाजी बोर्गे यांच्यामार्फत व्याख्यानातून शिवरायांचे चरित्र, त्यांची अर्थनिती, व्यवस्थापन व राजकारण या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. गणेशोत्सव सुरू करण्यामागे लोकमान्य टिळकांची भूमिका आदर्श मानून बालमित्र सार्वजनिक मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, बोलेवाडी, दादर (इच्छापुर्ती गणेश) यांच्यामार्फत असे समाजोपयोगी उत्सव सातत्याने दरवर्षी केले जातात.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून 'शिवरायांचे आठवावे रूप' या संकल्पने दगडांच्या दे...
22/09/2023

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाचे औचित्य साधून 'शिवरायांचे आठवावे रूप' या संकल्पने दगडांच्या देशा संस्थेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगभरातील अस्सल दुर्मिळ चित्रांच्या प्रतिकृती आणि ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन दादरच्या ईच्छापूर्ती गणेश मंडळाने मुंबईकरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.

तेव्हा जास्तीत जास्त इतिहास प्रेमी, अभ्यासकांनी, मुंबईकरांनी या प्रदर्शनास भेट देऊन 'आपला जाणता राजा' ३५० वर्षांपूर्वी नक्की कसे दिसत होते, त्यांची चित्रे परदेशात कशी गेली याच्या रंजक कथांची अनुभूती नक्कीच घ्यावी.

स्थळः- ईच्छापूर्ती गणेश, बाल मित्र मंडळ, बोलेवाडी, एस के बोले मार्ग, पोर्तुगीज चर्च जवळ, दादर (पश्चिम ) वेळ:- सकाळी:- १०:०० ते रात्रो १०ः०० वाजेपर्यंत.

येताय ना.... आम्ही तुमची वाट पाहतोय!
25/02/2023

येताय ना.... आम्ही तुमची वाट पाहतोय!

अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏽
12/09/2022

अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏽

आभाळ भरुन आले होते तुम्ही येताना आणि आता डोळे भरुन आले आहेत तुम्ही जाताना 🥹♥️ #निरोप  #विसर्जन  #गणपतीबाप्पामोरया  #पुढच...
09/09/2022

आभाळ भरुन आले होते तुम्ही येताना आणि आता डोळे भरुन आले आहेत तुम्ही जाताना 🥹♥️
#निरोप #विसर्जन #गणपतीबाप्पामोरया #पुढच्या_वर्षी_लवकर_या

कार्यसम्राट आमदार श्री. कालिदास कोळंबकर यांनी आज आपल्या मंडळाला भेट देऊन बाप्पाचा आशिर्वाद घेतला.
09/09/2022

कार्यसम्राट आमदार श्री. कालिदास कोळंबकर यांनी आज आपल्या मंडळाला भेट देऊन बाप्पाचा आशिर्वाद घेतला.

बाप्पाची विसर्जन मिरवणुक आणि धोल ताशा  #महावादन  #वादक   #ढोलताशा  #रावण  #इच्छापुर्तीगणेश  #बोलेवाडी  #दादर  #गणपतीबाप्...
08/09/2022

बाप्पाची विसर्जन मिरवणुक आणि धोल ताशा
#महावादन #वादक #ढोलताशा #रावण #इच्छापुर्तीगणेश #बोलेवाडी #दादर #गणपतीबाप्पामोरया #विसर्जनसोहळा

कार्यसम्राट आमदार श्री. सदा सरवणकर आणि श्री. गिरीष धानुरकर यांनी आज आपल्या मंडळाला भेट देऊन बाप्पाचा आशिर्वाद घेतला.
08/09/2022

कार्यसम्राट आमदार श्री. सदा सरवणकर आणि श्री. गिरीष धानुरकर यांनी आज आपल्या मंडळाला भेट देऊन बाप्पाचा आशिर्वाद घेतला.

बाल मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, बोलेवाडी, दादर, इच्छापुर्ती गणेश आयोजित लॅाटरीची भव्य सोडत. सर्व लॅाटरी धारकांनी ठीक...
08/09/2022

बाल मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, बोलेवाडी, दादर, इच्छापुर्ती गणेश आयोजित लॅाटरीची भव्य सोडत. सर्व लॅाटरी धारकांनी ठीक सायं ८.०० वाजता आपल्या लॅाटरी टिकीटसह मंडपात जमावे.

Address

S.k.bole Road
Mumbai
400028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when इच्छापुर्ती गणेश, बोलेवाडी, दादर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share