The Buddhist Society of India

The Buddhist Society of India The Buddhist Society of India

04/10/2022

६६ वे धम्म चक्र प्रवर्तन दिन के अवसर पर दीक्षाभूमि, नागपुर से ३० दिवसीय सामनेर दीक्षा प्राप्त की ।

समस्त बौद्धांच्या माहिती करिता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभे चे राष्ट्रीय अध्यक्ष - विश्वस्त अध...
03/10/2022

समस्त बौद्धांच्या माहिती करिता

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभे चे राष्ट्रीय अध्यक्ष - विश्वस्त अध्यक्ष तथा दि वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट चे स्टँडिंग कमिटी सेक्रेटरी आयु. राजरत्न आंबेडकर ह्यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषदे चे गुजरात चे उपाध्यक्ष राहिलेले दिवंगत पी. जी. ज्योतीकर ह्यांनी नियुक्त केलेल्या कार्यकारिणी ने पत्र काढून बौद्ध बांधवांना राजरत्न आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियास सहायता करू नये असे सूचित केले आहे.

काही दिवसांपूर्वी, मा. धर्मादाय आयुक्त कार्यालय, वरळी, मुंबई येथे दि. ज्योतीकर ह्यांनी निवडलेल्या कार्यकारिणी ने सह आयुक्त ‘जोशी’ ह्यांच्या समोर विनंती अर्ज केला कि, राजरत्न आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेले दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे बँक खाते गोठवण्यात यावे व राजरत्न आंबेडकर ह्यांना संस्थेच्या नावाने पैसे जमा करण्यावर बंदी आणावी. सदर अर्जावर सह धर्मादाय आयुक्त ‘जोशी’ ह्यांनी स्पष्ट केले कि राजरत्न आंबेडकर हे कायदेशीर रिपोर्टींग ट्रस्टी असल्याकारणाने त्यांना संस्थेच्या नावाने बँक खाते उघडणे, चालवणे व लोकांकडून निधी प्राप्त करणे ह्यावर बंदी आणणे शक्य नाही परंतु आपण देणगीदारांना राजरत्न आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली चालणाऱ्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियास देणगी देऊ नये असा प्रचार करावा.

त्याच आदेशाचे पालन करीत दि. ज्योतीकर ह्यांची कार्यकारिणी समाज माध्यमांवर राजरत्न आंबेडकर ह्यांच्या अध्यक्षेतेखालील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया - भारतीय बौद्ध महासभेस सहकार्य करू नये अश्या आशयाचे विविध पोस्ट्स व पत्रे प्रकाशित करीत आहेत. तरी विश्व हिंदू गुजरात चे उपाध्यक्ष राहिलेले दिवंगत पी. जी. ज्योतीकर ह्यांनी नियुक्त केलेले राष्ट्रीय अध्यक्ष व विश्वस्त अध्यक्ष चंदू पाटील व हरीश रावलीया व कार्यकारिणी राजरत्न आंबेडकर ह्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षतेखाली अश्व गतीने प्रगतीपथावरील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियास रोखण्याचा केविलवाणा प्रयोग करीत आहेत.

सदर अपप्रचाराला बळी न पडता समस्त बौद्धांनी तर्क बुद्धीचा वापर करावा हि विनंती.

(आयु. दिनेश मारोतराव हनुमंते)
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा
डॉ. आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता लेन, दादर पूर्व, मुंबई - १४

05/07/2020

Address

Golukdas Pasta Lane
Mumbai
400014

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Buddhist Society of India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to The Buddhist Society of India:

Share