Vedang Jyotish

Vedang Jyotish Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vedang Jyotish, Religious organisation, Kalase Nagar, Pandharpur Road, Mohol.

Professional Astrologer, Certified Gemstone, Kudali, Vastu Suggestions, Business Muhoortha, Rudraksha, Patrika, Muhoorta, Shanti / Abhishek, Match Making(Guna Milan), Vastu Shastra

21/06/2025

बाधा दृष्ट निवारण
जो मनुष्य व लहान बालक बाहेरच्या बाधेनी पीडीत किंवा दृष्ट लागलेली आहे असे वाटत असेल तर हा उपाय करावा. बाधित व्यक्ती ला घराच्या अंगणात पूर्वेला बसवावे. लहान बाळाला आईच्या मांडीवर घेऊन बसवावे.दक्षिण दिशेला मातीच्या थाळीत अग्नी,पेटता विस्तू, जळता कापूर ठेवावा.दृष्ट काढणाऱ्या माणसाने /स्त्रीने आपल्या दोन्ही हातात, खडेमीठ,लाल मिरची व मोहरी घ्यावी. खालील मंत्राने बाधित व्यक्तीच्या अंगावरून वरून खाली अशी तीन वेळा ओवाळून विस्तवाच्या थाळीत घालावी. ती थाळी नंतर बाहेर लांब नेऊन फोडावी.
[ मंत्र-ओम् उग्र रुपाय नृसिंहाय कालभैरवाय हरीमर्कटाय नम: अमुक नाम्ने बाधकस्य भूत,प्रत, पिशाच्च, शाकिनी, डाकिनी,ब्रह्मराक्षस परपीडा परदृष्टी नाशय नाशय बंधय बंधय कुरू स्वाहा ]
टीप - अमुक नाम्ने या ठिकाणी बाधित व्यक्तीचे नाव घ्यावे
शुभं भवतु :

30/12/2024

मांगलीक स्नानाच्या माध्यमातून ग्रह दोष दूर करण्यासाठी वापरायची सामुग्री.
• सोमवार - दूध
•मंगळवार - केशर
•बुधवार-विलायची
•गुरुवार - हळद
•शुक्रवार -अत्तर
•शनिवार - तीळ
•रविवार - गुळ / गहू

22/08/2024

जननशांती शास्त्रार्थ माहिती
==================
पंचांगात सांगितल्याप्रमाणे तिथि, नक्षत्र, योग, करण
व इतर जननशांती बद्दल माहिती

तिथी
===
कृष्ण चतुर्दशी
अमावस्या
क्षयतिथी

नक्षत्र
===
1)अश्विनीची पहिली ४८ मिनिटे,
2)पुष्याचा दुसरा व तिसरा चरण
3)आश्लेषा पूर्ण नक्षत्र
4)मघा प्रथम चरण
5)उत्तराचा प्रथम चरण
6)चित्राचा पूर्वार्ध
7)विशाखाचा चतुर्थ चरण
8)ज्येष्ठा पूर्ण नक्षत्र
9)मूळ पूर्ण नक्षत्र
10)पूर्वाषाढाचा तिसरा चरण
11)रेवतीची शेवटची ४८ मिनिटे

योग
===
वैधृति योग
व्यतीपात योग
विष्टि करण (भद्रा)

इतर
===
ग्रहणपर्वकाल,
यमल म्हणजे जुळे जन्मल्यास,
सदंत,
अधोमुख जन्म
माता पिता भाऊ बहिण यांचे पैकी एकाचे जन्म नक्षत्रावर जन्म असल्यास.
तीन मुली नंतर मुलगा किंवा तीन मुलानंतर मुलगी जन्मल्यास
सूर्य संक्रमण पुण्यकाल,
दग्ध योग
यमघंटयोग
मृत्युयोग
यापैकी काही योग असेल तर शांती करावी.

धर्मसिंधु प्रमाणे जननशांती शास्त्रार्थ व परिणाम.
=============================
१) मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणावर पुत्राचा जन्म झाल्यास पिता मरण पावतो.
तिसर्या चरणी धननाश व
चतुर्थ चरणी कुलनाश होतो.
तसेच मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणावर पुत्रीचा जन्म झाल्यास सासरा मरण पावतो.
द्वितीय चरणी सासू मरण पावते.
पुढील चरणांचे फल तसेच जाणावे.
म्हणून मूळ नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्म झाला असल्यास शांती करावी.

अभुक्त मुळ म्हणजे काय ?
----------------------------------
ज्येष्ठा नक्षत्राच्या शेवटच्या दोन घटिका म्हणजे ९६ मिनिटे व मूळ नक्षत्राच्या सुरवातीच्या दोन घटिका म्हणजे ९६ मिनिटे या १९२ मिनिटांच्या कालावधीस अभुक्त मूळ असे म्हणतात. अभुक्त मूळ असता जन्म झाल्यास आठ वर्षे बालकास अन्यत्र ठेवावे.
(म्हणजेच त्याचा त्याग करावा.) व त्यानंतर त्याची शांती करावी. मूळ नक्षत्राचा दोष आठ वर्षे पर्यंत असतो. म्हणून इतका काल पर्यंत मुलाचे दर्शन वर्ज्य करावे.

२) आश्लेषा नक्षत्राच्या द्वितीय चरणी धननाश, तिसर्या चरणी मातृनाश व चतुर्थ चरणी पितृनाश. तसेच सासू-सासरे यांचा नाश या करिता आश्लेषा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्म झाला असल्यास शांती करावी.

३) ज्येष्ठा नक्षत्रावर कन्या जन्मल्यास ज्येष्ठ दिरास मारते. ज्येष्ठा नक्षत्राचे समान दहा भाग केल्यास पहिल्या भागात बालकाचा जन्म झाल्यास - मातेची आई, दुसरा भाग - आईचे वडिल मरण पावतील, तिसरा भाग - मामा मरण पावेल, चौथा भाग - मातृनाश, पाचवा भाग - स्वतः मरण पावेल, सहावा भाग - गोत्रज मरण पावतील. सातवा भाग - पिता व माता अशा दोन्ही कुलांचा नाश, आठवा भाग - ज्येष्ठ बंधु मरण पावतो, नववा भाग - सासरा मरण पावेल व दहावा भाग - सर्वांना मारतो. याकरिता ज्येष्ठा नक्षत्रावर जन्मलेल्या बालकांची शांती करावी.

टीप - म्हणून मूळ, आश्लेषा, ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची शांती करून घ्यावी.

४) चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध - पुष्य नक्षत्राचे मधले दोन चरण, पूर्वाषाढा - तिसरा चरण,
उत्तरा फाल्गुनी - प्रथम चरण
या नक्षत्रांवर बालकाचा जन्म झाल्यास पिता, पुत्र, भ्राता व स्वतः यांचा नाश होतो. याकरिता
अ) चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध आसता गोप्रसवशांति करून नक्षत्र देवतेची पूजा व अजा दान करावे.
ब) पुष्य नक्षत्राचे मधले दोन चरण - गोप्रसव शांति करून नक्षत्र देवतेची पूजा व गाईचे दान करावे.
क) पूर्वाषाढा - तिसरा चरण - नक्षत्र देवतेची पूजा व सुवर्ण दान करावे.
ड) उत्तरा फाल्गुनी प्रथम चरण - नक्षत्र देवतेची पूजा व तिलपात्र दान करावे.

५) मघा नक्षत्राच्या पहिल्या चरणात जन्म झाल्यास मूळ नक्षत्राप्रमाणे फळ जाणावे त्या ठिकाणी गोप्रसवशांती, नक्षत्र देवतेचे पूजन व ग्रहमख शांती ही करावी.
मघा नक्षत्राच्या पहिल्या १९२ मिनिटात जन्म झाला असल्यास नक्षत्र गंडातशांती करावी.

६) रेवती नक्षत्राच्या शेवटच्या १९२ मिनिटात व अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या १९२ मिनिटात जन्म झाला असल्यास नक्षत्र गंडांत शांति करावी. अन्य वेळा जन्म असेल तर शांती नाही.

७) विशाखा नक्षत्राच्या चतुर्थ चरणी जन्म झाला असल्यास फक्त ग्रहमख करावा. नक्षत्रशांती नाही.

८) इतर सर्व नक्षत्रांच्या शांती नाहीत.

९) शांतीचा मुख्य काल - जन्म झाल्यावर बाराव्या दिवशी अथवा जन्मनक्षत्री अथवा शुभ दिवशी शांति करावी. जन्म झाल्यावर बाराव्या दिवशी शांति करावयाची असेल तर सांगितलेली नक्षत्रे, आहुति, अग्निचक्रे इत्यादी पहाण्याची जरूरी नाही.

इतर काली शांती करावयाची असेल तर अवश्य पंचांग पहावे.
अग्निचक्र पंचांगात दिलेले असते. ते पहावे किंवा शु. १ पासून चालू तिथिपर्यंत तिथि मोजून येणार्या संख्येत १ मिळवावा. रविवार पासून चालू दिवसांपर्यंत दिवस मोजावेत. तो अंक मागील अंकात मिळवावा. या बेरजेस ४ ने भागून बाकी ० किंवा ३ उरल्यास अग्नि भूमीवर, २ उरल्यास पाताळी, १ उरल्यास स्वर्गलोकी अग्नि जाणावा. शांतीचे दिवशी अग्नि भुमीवर असावा.

आहुति पाहण्याचा पद्धत :
---------------------------------
सूर्यनक्षत्रापासून आरंभ करून चंद नक्षत्रापर्यंत नक्षत्रे मोजावीत. ३ ३ नक्षत्रे मिळून एक ग्रहाचे मुखी आहुति पडते.
पहिल्या ३ नक्षत्री सूर्याचे मुखी, दुसर्या ३ नक्षत्री बुधाचे मुखी, तिसर्या ३ नक्षत्री शुक्राचे मुखी, चौथ्या ३ नक्षत्री शनीचे मुखी, पाचव्या ३ नक्षत्री चंद्राचे मुखी, सहाव्या ३ नक्षत्री मंगळाचे मुखी, सातव्या ३ नक्षत्री गुरूचे मुखी, आठव्या ३ नक्षत्री राहूचे मुखी, नवव्या ३ नक्षत्री केतूचे मुखी आहुति जाणावी.
ज्या दिवशी शुभ ग्रहाचे मुखी आहुति पडते तो दिवस शुभ व पापग्रहाचे मुखी आहुति असेल तर तो अशुभ दिवस मानावा.

संस्कार, नित्यकर्म, काही निमित्ताने करावयाची नैमित्तिक कर्मे व रोगाने पीडित असताना करावयाची कर्मे असतील तर अग्निचक्र पहावयास नको. मात्र
शांतीकर्मामध्ये अग्निचक्र अवश्य पहावे.

उत्तरा फाल्गुनी, उत्तरा आषाढा आणि उत्तरा भाद्रपदा, रोहिणी, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पुनर्वसु, स्वाती, मघा, अश्विनी, हस्त, पुष्य, अनुराधा व रेवती ही नक्षत्रे असताना, आणि गुरुशुक्राचा अस्त नसताना व मलमास नसेल तर तो दिवस शुभ मानावा.

16/08/2024

* खरमास म्हणजे काय?
-> धनु ♐आणि मीन ♓ या दोन्ही गुरू ग्रहाच्या राशी असून जेव्हा सूर्य धनु किंवा मीन राशीमधून गोचर भ्रमण करतो त्या महिन्याला खरमास असे म्हणतात.
ढोबळमाने सूर्याचे गोचर भ्रमण १५ डिसेंबर ते १४ जानेवारी दरम्यान धनु राशीमधून होते. यामध्ये मार्गशीर्ष महिन्याचे काही दिवस आणि पौष महिन्याचे काही दिवस येतात. या कालावधीस खरमास असे म्हणतात.
तसेच ढोबळमाने सूर्याचे गोचर भ्रमण १४ मार्च ते १३ एप्रिल दरम्यान मीन राशीमधून होते. यामध्ये फाल्गुन महिन्याचे काहीं दिवस आणि चैत्र महिन्याचे काही दिवस येतात. या कालावधींस खरमास असे म्हणतात. आणखी एका प्रचलित आख्यायिकेनुसार, या महिन्यात सूर्याच्या रथाला गाढव जोडले जाते. कारण थकलेला घोडा विश्रांती घेतो. सूर्याचा रथ गाढव ओढत असल्याने या महिन्याला गाढव महिना म्हणतात. गुरुगृहात राहिल्याने सूर्याचे तेज कमी होते. सूर्य हा सर्व सृष्टीचा, जीवनाचा मुख्य आधार आहे. या काळात सूर्य मंद असतो, कोणत्याही प्रकारचे शुभ फल देण्यास तो म्हणावा तेवढा बलिष्ठ नसतो म्हणून कोणतेही शुभ कार्य करण्यास हे खर महिने निषिद्ध मानले जातात.
❌खरमासमधील निषिद्ध कार्ये ❌
1) खरमास दरम्यान सर्व प्रकारचे शुभ कार्य करण्यास निषिद्ध मानले जाते.
2) शुभकार्यामध्ये उपनयन आणि विवाह, नवीन कार्याचा प्रारंभ, दीक्षा, प्रवेश, गृहारंभ, गृह प्रवेश, वधू प्रवेश इत्यादी निषिद्ध आहेत.
3)विवाहासंबंधित कोणतेही कार्य निषिद्ध, वाहने, घरे, जमीन, दागिने खरेदी करणे निषिद्ध
4)कोणतेही शुभ कार्य जसे की मुलाचे जावळ, नामकरण करणे निषिद्ध आहे.
5)घरामध्ये प्रवेश करणे किंवा घरातील कोणतीही पूजा जसे की सत्यनारायण पूजा, देवी जागरण इत्यादी निषिद्ध 6)नवीन कपडे, बूट आणि चप्पल इ. खरेदी करणे निषिद्ध 7)खरमासात, सून माहेरी असेल तर तिने सासरी जाऊ नये तसेच सून सासरच्या घरी असेल तर तिने माहेरी जाऊ नये.
8)करिअरशी संबंधित कोणतीही नवीन नोकरी किंवा कोणताही नवीन व्यवसाय यावेळी सुरू करू नये.

28/04/2024

ज्योतिष हे माणसातील ज्ञान आणि अज्ञान ओळखणारं अध्यात्मचं म्हणावं लागेल त्यामुळेचं ते 'वेदांग'आहे.

10/09/2023

जननशांति कोणत्या दिवशी करावी ?
जननशांति १२ व्या दिवसापासून जास्तीत जास्त एक वर्षाचे आत करावी. नक्षत्रदोषाची जननशांति त्या नक्षत्रावर करता येते. मात्र त्या दिवशी पंचांगशुद्धि असणे आवश्यक आहे. त्या नक्षत्रावर करणे शक्य नसेल तर पंचांगशुद्धि असलेल्या कोणत्याही दिवशी शांति करता येते. परंतु कृष्ण चतुर्दशी, अमावास्या, वैधृति, व्यतीपातं, क्षयतिथि, भद्रा इत्यादि जननशांति करण्यासाठी तेच दिवस घेऊ नयेत. या जननशांति पंचांगशुद्धि असलेल्या कोणत्याही दिवशी कराव्यात.
एकापेक्षा जास्ती दोष असलेल्या जननशांति एकाच दिवशी करता येतात.
पंचांगशुद्धि पाहताना - प्रामुख्याने कृ. १३, कृ. १४, कृ. ३० या तिथि, क्षयदिन, वृद्धिदिन, करिदिन, वैधृति, व्यतीपात हे योग, भद्रा यांचे कालावधि वर्ज्य करावेत.

सूर्यपरिवाराचे एक सुंदर चित्र आज पहिल्यांदाच बघितले. मध्ये सूर्यदेव, उजवीकडे संज्ञा आणि डावीकडे छाया.त्याखाली यम-यमुना आ...
28/08/2023

सूर्यपरिवाराचे एक सुंदर चित्र आज पहिल्यांदाच बघितले.
मध्ये सूर्यदेव, उजवीकडे संज्ञा आणि डावीकडे छाया.
त्याखाली यम-यमुना आणि तापी-शनी, त्याखाली वैवस्वत, नासत्य, रेवंत, दस्र आणि सावर्णी.

अतिशय दुर्मिळ असे चित्र.

रुद्राक्ष
08/07/2023

रुद्राक्ष

07/06/2023

📿 जप कसा करावा ? 📿

१ } बोटे मोजुन जप केल्याचे एकपट पुण्य असते.
२ } बोटांच्या पेरावर जप करण्याचे दसपट पुण्य असते.
३ } शंखमणीने शतपट पुण्य असते.
४ } प्रवालमाळा सहस्त्रपट पुण्य असते.
५ } मोत्याच्या माळेने लक्ष्यगुण पुण्य असते.
६ } पदमाक्षिमाळेने दशलक्ष्य पुण्य असते.
७ } सुवर्णमाळा कोटिगुण पुण्य असते.
८ } कुशरुद्राक्षमाळा अनंतगुण पुण्य

जपमाळेने जप करता मेरुमणी ओलंडू नये.माळ उलट करावी.

📿 जपसंख्या मोजतांना माळेचा हात कुठे असावा 📿

-:🔸 सकाळी नाभि समोर.
-:🔹 दुपारी हृदया समोर.
-:🔸 संध्याकाळी मुखासमोर असावा.

-:🔹 प्रातः काळी उभे राहून जप करावा.
-:🔸 दुपारी बसून अथवा उभे राहून जप करावा.
-:🔹 संध्याकाळी बसून जप करावा.

03/03/2023

Address

Kalase Nagar, Pandharpur Road
Mohol
413213

Opening Hours

Monday 10am - 5pm
Wednesday 10am - 5pm
Thursday 10am - 5pm
Friday 10am - 5pm
Saturday 10am - 5pm
Sunday 10am - 5pm

Telephone

+919423923194

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vedang Jyotish posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Vedang Jyotish:

Share