श्री. पद्मावंती देवी नाळे.

  • Home
  • India
  • Khopoli
  • श्री. पद्मावंती देवी नाळे.

श्री. पद्मावंती देवी  नाळे. श्री. पद्मावंती देवी नाळे.

ईश्वर सजीव आणि निर्जीव स्वरुपात संपूर्ण विश्वात व्यापून राहिला आहे. अशी ईश्वराच्या अस्तित्वाची कल्पना पूर्वापार आहे. ईश्वराचे नामःस्मरण हे मानवाच्या जीवनाचे एक नैसर्गिक कर्मच होऊन गेले आहे. अस्थिक तर ईश्वराचे स्मरण करीत असतातच पण स्वतःला नास्तिक म्हणणारे हि नकळत देवाचे नाव घेत असतात. ईश्वराच्या साकार अवस्थेची पूजा-अर्चा फार पूर्वी पासूनच आहे. या देवता काही दृश्य तर काही अदृश्य रुपात आहेत. देवांची

पूजा हि एकप्रकारची शक्तीपुजाच होय.
भक्तांच्या हाकेला धावून येणारी नाळे गावची माता पद्मावती देवी !
मित्रांनो आज आपण माहीती घेणार आहोत अश्या देवीची , जी भुमीगत(जमीनीखालील स्थान) असुन खुपच जाग्रुत आहे.वसई तालुक्यातील नाळे हे छोटेसे गांव.या गावामध्ये असलेली माता पद्मावती..
माता पद्मावती ही मां आदिशक्तीचा एक अवतार आहे.पश्चिम किनारपट्टीवरील सात बहीणींपैकी माता पद्मावती ही एक देवी.माता पद्मावतीचे स्थान हे सोमवंशीय क्षत्रीय समाजाच्या नारळ व सुपारींच्या दाट वाडीमध्ये एका शांत ठिकाणी आहे.
फार वर्षापुर्वी देवीच्या मुर्तीवरील दागीने चोरांनी चोरून देवीची मुर्ती नाळे गावातील निलाक्षी तलावात( पद्मावती देवी तलाव) टाकली.खुप शोधाशोध होवुनही देवीच्या मुर्तीचा ठाव लागेना. अश्या वेळी भंडारी समाजाचे(शेषवंशीय समाज) देवीचे एक निस्सीम भक्ताच्या स्वप्नात येवुन देवीने द्रुष्टांत दिला, " वत्सा , या नाळे गावातील तलावामध्ये मी आहे.मला येथुन काढ ." त्या भक्ताच्या स्वप्नावर विश्वास ठेवुन गावकयांनी तलावामध्ये शोध घेतला असता देवीची म्रुर्ती मिळाली. पुन्हा देवीला तीच्या मुळ स्थानी आणण्यात आले. त्या दिवसांपासुन देवीच्या सेवेचे भाग्य शेषवंशीय समाजाला(म्हात्रे,पाटील,चौधरी व चोरघे) लाभले.
देवीचे पुर्वी मंदीर नव्हते.पण आता सुंदर मंदीर बांधण्यात आले आहे. देवीच्या मंदीराबाबत एक अट होती की सुर्यास्त झाल्यानंतर मंदीराच्या पायाचे काम चालु होवुन सुर्योदयाच्या अगोदर कळस बसला गेला पाहीजे. माता पद्मावती देवीची मुळ म्रुर्ती ही एका संगमरवरी लादीखाली सुरक्षीत असुन वेळोवेळी नवस किंवा इतर धार्मीक कार्यासाठी सकाळी सुर्योदयानंतर बाहेर काढली जाते. देवी बाहेर काढताना कोंबडा दाखवला जातो. तिथुन ती म्रुर्ती थोड्याच अंतरावर दर्शनासाठी बनवलेल्या मंडपात ठेवण्यात येते.देवीच्या मुळ मुर्तीवर मुखवटा लावला जातो. देवीला साडी-चोळी नेसवुन दागदागीन्यांनी मढवले जाते. मग देवीपुढे दिवसभर खणानारळ व ओट्या घेवुन भक्तगण उभे रहातात. दिवसभर मनोभावे देवीची पुजाअर्चा झाली की सुर्यास्त होण्याअगोदर देवीला पुन्हा मंदीरातील छोट्या भुयारात ठेवतात. त्यानंतर पुन्हा त्यावर संगमरवरी लादी ठेवली जाते.पुर्वी देवीच्या संगमरवरी लादीवर नवस म्हणुन लाकडाचे मुखवटे, हात , पाय ठेवत असत.
माता पद्मावती देवीचा गावकयांनी नवचंडी व शतचंडी यज्ञ केलेला आहे. गावकर्यांकडुन वर्षातुन एकदा देवीपुढे मांस अर्पण केले जाते याला स्थानीक भाषेत 'गावाळी' असे म्हणतात. सोमवंशीय क्षत्रीय (वाडवळ) व शेषवंशी क्षत्रीय (भंडारी) समाजातील काही लोक तर वर्षातुन एकदा न चुकता देवीपुढे कोंबडाही देतात. देवी ज्या स्थानी विराजमान अहे त्या ठिकाणाला देवीची वाडी असेही म्हणतात. या देवीच्या वाडीतील ग्रामस्थ रोजची देवीची पुजाअर्चा नित्यनेमाने करतात. तसेच नवरात्रामध्ये देवीचा ९ रात्री जागर व एक दिवस भंडारा ठेवला जातो. भक्तांच्या हाकेला धावुन जाणाया माता पद्मावती देवीची महती अगाधच म्हणावी लागेल. नाळे गांव वआजुबाजुच्या पंचक्रोशीवर देवीचा वरदहस्त आहे असे गावकरी मोठ्या भक्तीभावाने म्हणतात.
मित्रांनो ,माता पद्मावती देवी दर्शनासाठी जेव्हा जेव्हा बाहेर काढली जाईल त्याची माहीती आम्ही तुम्हाला जरूर कळवु..
बोला पद्मावती माते की जय. -

Address

नाळे
Khopoli
410203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री. पद्मावंती देवी नाळे. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री. पद्मावंती देवी नाळे.:

Share