10/04/2025
सर्वांना कळविण्यात अत्यंत दुःख होतं आहे की जय गुरूदेव आश्रम ट्रस्टचे विद्यमान , ज्येष्ठ विश्वस्त *स्वामीभक्त श्री मनोहर विनायक मालशे* (राहणार विलेपार्ले ) ह्यांचे आज दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी दुपारी व्रुद्धापकालाने दुःखद निधन झाले आहे. तें ८० वर्षांचे होते.
स्वामी समर्थाप्रती अढळ श्रद्धा हाच त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता. स्वामी स्वरुपानन्द ह्यांचे पेण येथील शिष्य स्वामी अमलानन्द हे त्यांचे आध्यात्मिक गुरू . गुरुभेटीआधी हिमालयातील कठीण तीर्थयात्राही त्यांनी वयाच्या 40 त असतानाच सहकुटुंब केल्या.
तळेगाव येथील गजानन महाराज क्रुपान्कित आपटे आजी , पुणेस्थित स्वामी समर्थ क्रुपान्कित कान्हेरे गुरुजी, रत्नागिरी येथील नाथपंथीय सद्गुरू प्रसादे महाराज , आपले पाठक गुरुजी , नानामहाराज तरानेकर क्रुपान्कित ज्येष्ठ साधक विलेपार्लेस्थित श्री लेलेकाका इत्यादी सत्पुरुषांचा दीर्घ सहवास , आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आशीर्वाद
त्याना लाभले आहेत .
सद्गुरू पाठकगुरुजींच्या प्रेरणेने आणि लेलेकाकांच्या सान्निध्यात सन 2022 साली आपल्या आश्रमात सुप्रसिद्ध प्रवचनकार श्री मकरंदबुवा रामदासी ह्यांची रामकथा त्यांनी आयोजित केली होती त्याचा लाभ आपण सर्वांनी घेतला आहेच . गेल्या वर्षी आश्रनाच्या पहिल्या मजल्यावरील झालेल्या बांधकामांचा रीतसर कागदोपत्री आराखडा - पाठपुरावा आणि वेळोवेळी मार्गदर्शन त्यांनी केल्यामुळेच सर्व प्रोजेक्ट व्यवस्थित पुर्ण होऊ शकला ह्याबद्दल दुमत नाहीं.
एक श्रद्धालु, अभ्यासपुर्ण , दूरदर्शी आणि परोपकारी व्यक्तिमत्व आज अनन्तात विलीन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही ईशचरणी प्रार्थना