19/10/2022
"शिवसृष्टी पुणे" आयोजित
किल्ला शिवरायांचा – किल्ले बांधणी स्पर्धा - 2022
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड – किल्ल्यांचा इतिहास आजच्या पिढीला समजायचा असेल तर त्यांच्या हातात आज मोबाईलऐवजी त्यांना प्रत्यक्ष कार्यातून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. त्यासाठी दगड – माती, चिखल, काळी – तांबडी माती त्यांच्या हाताला लागली पाहिजे. जवळपासचे गड – किल्ले यांना भेटी देवून त्यांची माहिती घेतली पाहिजे. त्यांना संरक्षित – संवर्धित केले पाहिजे. तरच महाराष्ट्राचे हे वैभव टिकून राहील. हे सारे कृतीतूनच होईल.
या दिवाळीत नव्या कपड्यांसह पर्यावरणपूरक फटाक्यांची आतिषबाजी करत चटकदार - मसालेदार - खमंग फराळाबरोबर गोड – गोड लाडूची मजा घेत...........
चला तर मग आहात ना तयार !
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गड – किल्ल्यांची प्रतिकृती बनवायला.
>> स्पर्धा कालावधी : 18 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2022
स्पर्धेची बक्षिसे : गटानुसार बक्षीस
1. प्रथम - सन्मानचिन्ह व रोख रक्कम.
2. द्वितीय - सन्मानचिन्ह व रोख रक्कम.
3. तृतीय - सन्मानचिन्ह व रोख रक्कम.
4. उत्तेजनार्थ -5 - बक्षीस व सहभाग प्रमाणपत्र.
विजेत्या आणि उत्तेजनार्थ गटास इतिहास अभ्यासक श्री पांडुरंग बलकवडे यांच्या सानिध्यात "शिवसृष्टी पुणे" येथे विशेष भेट.
अधिक माहिती व प्रवेशिकेसाठी सोबतच्या लिंकला भेट द्या
किल्ला शिवरायांचा – किल्ले बांधणी स्पर्धा - २०२२