Shree Ram Mandir Vaishya Vasahat,Chiplun

Shree Ram Mandir Vaishya Vasahat,Chiplun श्री राम मंदिर हे गुरु परंपरेतील असून त्याची स्थापना सन १८१७ मधे करण्यात आली .

चिपळूण शहरातील, वैश्यवसाहत प्रभागातील,श्री समर्थ रामदास स्वामी सांप्रदायीक, सज्जनगड शिष्यगण गुरुपरंपरेतील,श्रीराम मंदिर सन १८१७ मध्ये स्थापन करण्यात आले.

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे वेळी श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रभू रामचंद्र उपासना पद्धती राजकीय प्रचारासाठी सुरु केली. कोंकण प्रांतात श्री रामदासी संप्रदायाचे कै. गांगशेठ शेट्ये हे एक मुख्य प्रचारक होते, त्यांना गोसावी या

नांवे संबोधीत असत. त्यांना श्रीराम पादुका वृद्धकाळात श्री समर्थ रामदास स्वामींनी पूजेसाठी दिल्या. त्यांनी त्या प्रथम 'लक्ष्मीकेशव'(लक्ष्मी-नारायण) देवस्थानात ठेवल्या. नंतर त्यांचा पणतू कै. शेट्याप्पा शेट्ये यांनी सादर श्रीराम मंदिर सन १८१७ च्या सुमारास बांधून पादुका येथे आणल्या व स्वतंत्र श्रीराम जन्म उत्सव व इतर कार्यक्रम सुरु केले.

श्री समर्थ कल्याण स्वामी यांचे शिष्यगण परंपरेतील पणतू श्री लक्ष्मण स्वामी यांनी स्वहस्ते सदर मंदिरातील श्रींच्या मूर्तिची प्रतिष्ठापना सज्जनगडावरून मूर्ती आणून केली.

श्रीराम मंदिरामध्ये सज्जनगडावरील गुरुपरंपरेनुसार वार्षिक व नित्यनैमित्तिक उत्सव कार्यक्रम साजरे केले जातात. मंदिरात प्रतिवर्षी श्री रामनवमी, श्री हनुमान जयंती,काकड आरती,त्रिपुरारी पौर्णिमा, नामसप्ताह, रामदास नवमी, अधिक मास - नाम जप आदी कार्यक्रम साजरे केले जातात.

12/07/2025

I got over 6,100 reactions on one of my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

03/07/2025

I got over 62,000 reactions on my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

Big shout out to my newest top fans! 💎 Shreeram Deolekar, Sameer Shetye, Rajlaxmi Deolekar, Mrunali Kamerkar, Siddharth ...
28/06/2025

Big shout out to my newest top fans! 💎 Shreeram Deolekar, Sameer Shetye, Rajlaxmi Deolekar, Mrunali Kamerkar, Siddharth Kolwankar

Drop a comment to welcome them to our community,

Address

Chiplun

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ram Mandir Vaishya Vasahat,Chiplun posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category