खर्डा एक ऐतिहासिक शहर.

खर्डा एक ऐतिहासिक शहर. शिवपट्टन
खर्डा :ऐतिहासिक,धार्मिक पर्यटन स्थळ.

जयहिंद..!
15/08/2026

जयहिंद..!

15/08/2026

#चलो_बारा_प्रतिज्योतीर्लिंग_मंदिरे

।।..चला खर्डा शहर व परिसरातील बारा प्रतिज्योतिर्लिंगांच्या श्रावण वारीला....।।
******************************************************

पवित्र श्रावण महिण्यात खर्डा शहर व परिसरातील पुरातन व जाग्रुत प्रतिज्योतिर्लिंगांची यात्रा करणे ही एक वेगळीच अनुभूती आहे.
अगदी नास्तिक माणूसही या सफरीत अध्यात्मिक शक्तीची तसेच धार्मिक कार्याची व श्रद्धेची अविस्मरणीय अनुभूती घेऊ शकतो.
सर्व मंदिरांच्या दर्शनासाठी साधारण ६० किलोमीटरचे अंतर पार पाडावे लागते. निसर्गाच्या साक्षीने व दगदग,गर्दी शिवायचे देवदर्शनाचा अनोखा अनुभव आपल्याला परमोच्च समाधान देऊन जातो...
एकदा अनुभव घ्याच...
तुम्ही चक्क देवाच्या व अध्यात्मिक शक्तीच्या प्रेमात पडाल हे खात्रीपूर्वक सांगतो..
आता आजपासून आपण या बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदिरांची माहिती घेणार आहोत...
(या अगोदरही या पेजवर या सर्व बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदिरांची माहिती व महती छायाचित्रांसह विस्तृत स्वरूपात दिलेली आहे.)

३) श्री क्षेत्र ओंकारेश्वर,खर्डा

खर्डा परिसरातील बारा प्रतिज्योतिर्लिंग मंदीरांपैकी चार मंदीरे खर्डा शहरात आहेत. त्यापैकी एक असलेले हे ओंकारेश्वराचे मंदीर शहरातील शुक्रवार पेठ या भागात आहे. सर्व बारा मंदीरांपैकी सर्वात सुंदर, सुबक रचना असलेले व सुस्थितीत असलेले हे शिवमंदीर आहे. मंदीराला पुर्वाभिमुखी एकमेव भव्य प्रवेशद्वार असून भोवती तटबंदी आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच दोन्ही बाजूच्या भव्य दिपमाळा लक्ष वेधून घेतात. मंदीरासमोरील नंदीही भव्य आहे. नंदीलगत एका चबुतऱ्यात एक दगडी मोठी घंटा आहे व ती एखाद्या धातूप्रमाणे आवाज देते.
या मंदीराच्या समोरच अष्टकोनी पुरातन बारव आहे. त्याला बारमाही पाणी असते. या बारवाचे पाणी एका ठराविक पातळीवर आल्यास ओंकारेश्वराच्या गाभाऱ्यात पाणी येते व शिवलिंग पूर्णतः पाण्याखाली जाते.
हे एक जाग्रुत देवस्थान म्हणून परिचित आहे.

15/08/2026
🌿❤️ आय लव्ह शिवपट्टण ❤️🌿आपल्या शिवपट्टण नगरीतील ऐतिहासिक, पारंपरिक सण-उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक का...
15/08/2026

🌿❤️ आय लव्ह शिवपट्टण ❤️🌿

आपल्या शिवपट्टण नगरीतील ऐतिहासिक, पारंपरिक सण-उत्सव, अखंड हरिनाम सप्ताह, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम आणि आपल्या गावातील सुंदर आठवणींचे व्हिडिओ आता YouTube वर! 🎥📸

👉 आपल्या “I Love Shivpattan” YouTube चॅनेलला Subscribe करा 🔔
👉 व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा
👉 आपल्या मित्र-परिवारासोबत Share करा ❤️

🙏 आपल्या गावाचा आवाज… आपल्या गावाची ओळख…
❤️ I LOVE SHIVPATTAN ❤️

🔗 YouTube Channel:
"I Love Shivpattan – YouTube"

आजच Subscribe करा आणि आपल्या शिवपट्टणशी जोडलेले रहा! 🌿❤️🔔

*खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा*

🔔 चॅनेलला Subscribe करा आणि आपल्या गावाच्या प्रत्येक खास क्षणाचे साक्षीदार व्हा. ❤️ I Love Shivpattan | आय लव्ह शिवपट्टण ❤️ आपल्या .....

Address

Ahmednagar

Telephone

+919503500479

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when खर्डा एक ऐतिहासिक शहर. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to खर्डा एक ऐतिहासिक शहर.:

Shortcuts

Share